Headlines

गंगापूर:पाण्यासाठी आज भेंडाळा फाट्यावर रास्ता रोको




नांदूर मधमेश्वर कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी, उन्हाळ्यात पिण्यासाठी पाणी मिळावे, या मागणीसाठी शुक्रवारी दुपारी २ वाजता भेंडाळा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. रब्बी हंगामासाठी तीन आवर्तने, उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन आवर्तने आणि टेल टू हेड पद्धतीने समान पाणीवाटप या मागण्यांसाठी आधार शेतकरी जलदूत समितीचे अध्यक्ष पंडित अण्णा शिंदे यांनी वैजापूर येथील पाटबंधारे विभाग कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. सर्व लाभधारक शेतकरी, महिला आणि युवकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *