Headlines

विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच उपक्रमशील व्हावे:प्रा. सुनील कल्हापूरे, डॉ. विखे पाटील अभियांत्रिकीत कॉग्नोत्सव 2026 उत्साहात‎



स्पर्धेच्या युगात आज प्रत्येक अभियांत्रिकी महावि‌द्यालयीन विद्यार्थ्यांनी तांत्रिक अभ्यासासोबतच विविध अभ्यासक्रम आणि अभ्यासेतर उपक्रमांचा देखील अनुभव घेण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन फाउंडेशनचे तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे यांनी केले. वि

.

या दोन दिवसीय महोत्सवामध्ये टेक केबिसी, युटोपिया (हॅकेथॉन) टेक ट्रेझर हंट, टेक एक्सलरेट, स्क्विड गेम, रणभूमी, रंगमंच या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी प्राप्त झाली. या महोत्सवामध्ये राज्यभरातील सुमारे ३५ महावि‌द्यालयांतून ७१० विद्यार्थांनी सहभाग नोंदवला.

यावेळी तांत्रिक संचालक प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ. रविंद्र नवथर, डॉ. रविंद्र तांबे, प्रा. विद्या जगताप, डॉ. दीपक दरंदले उपस्थित होते.

“कॉग्नोत्सव-२०२६” च्या कार्यक्रम समन्वयक प्रा. रेणुका देवराय होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध मान्यताप्राप्त व्यावसायिक संस्था, संगणक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एन. बी. विखे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संगणक अभियंता, विद्यार्थी संघटनेचे सर्व विद्यार्थी यांनी विशेष सहकार्य केले. फाउंडेशनचे डायरेक्टर टेक्निकल प्रा. सुनील कल्हापुरे, प्राचार्य डॉ.रवींद्र नवथर यांनी मार्गदर्शन केले.

या उपक्रमाचे संस्थेचे डायरेक्टर जनरल प्रशासन डॉ. पी. एम. गायकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुजय विखे, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या कलागुणांना वाव मिळाला तसेच महाविद्यालयीन जीवनात आनंदाचे क्षण अनुभवायला मिळाले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व संबंधितांचे कौतुक होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *