Headlines

Maharashtra Pensioners Digital Life Certificate Campaign November 2026


राज्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांसाठी दिलासादायक बातमी आहे. पेन्शन सुरू ठेवण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात सादर करावा लागणारा हयातीचा दाखला (लाइफ सर्टिफिकेट) आता घरबसल्या मोबाईलवरून सादर करता येणार आहे. केंद्र सरकारच्या पेन्

.

या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वांद्रे येथील अधिदान व लेखा कार्यालयात पूर्वतयारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मोहिमेचे नियोजन, अंमलबजावणी आणि ज्येष्ठ पेन्शनधारकांपर्यंत डिजिटल सुविधेची माहिती पोहोचविण्याबाबत आढावा घेण्यात आला.

‘जीवन प्रमाण’ ॲपद्वारे घरबसल्या दाखला

या मोहिमेअंतर्गत केंद्र सरकारच्या ‘जीवन प्रमाण’ ॲपच्या माध्यमातून निवृत्तीवेतनधारकांना बँक किंवा कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष जाण्याची गरज भासणार नाही. मोबाईलवरून फेस ऑथेंटिकेशनच्या मदतीने काही मिनिटांत डिजिटल जीवन प्रमाणपत्र तयार करता येणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कार्यालयातील रांगेत उभे राहण्याचा त्रास कमी होणार असून वेळ आणि श्रमांचीही बचत होणार आहे.

केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून पाहणी

या देशव्यापी मोहिमेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पेन्शन आणि पेन्शनभोगी कल्याण विभागाचे अवर सचिव दीपक गुप्ता यांनी मुंबईतील अधिदान व लेखा कार्यालयाला भेट दिली. यावेळी संचालनालय, लेखा व कोषागारे तसेच अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत मोहिमेच्या तयारीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

गुप्ता यांनी कार्यालयातील निवृत्तीवेतन शाखा आणि पेन्शन मदत कक्षाची पाहणी केली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ निवृत्तीवेतनधारकांना ‘जीवन प्रमाण’ प्रणाली आणि फेस ऑथेंटिकेशनच्या माध्यमातून अवघ्या काही मिनिटांत जीवन प्रमाणपत्र कसे तयार करता येते, याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

जास्तीत जास्त पेन्शनधारकांना लाभ घेण्याचे आवाहन

डिजिटल तंत्रज्ञानामुळे निवृत्तीवेतनधारकांना हयातीचा दाखला सादर करणे अधिक सोपे झाले आहे. प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास टाळण्यासाठी जास्तीत जास्त निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंबनिवृत्तीवेतनधारकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा. तसेच ‘जीवन प्रमाण’ पोर्टलद्वारे वेळेत हयातीचा दाखला सादर करावा, असे आवाहन अधिदान व लेखा अधिकारी प्रगती धनावडे यांनी केले आहे.

हेही वाचा….

उत्तर मुंबईत भाजप महायुतीची ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ रॅली:पीयूष गोयल यांचा राहुल गांधी, काँग्रेसवर निशाणा

उत्तर मुंबई भाजप आणि महायुतीच्या वतीने ‘लोकतंत्र बचाव, अराजकता हटाव’ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि खासदार पीयूष गोयल यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत भाजपसह शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. विरोधकांकडून पसरवण्यात येणाऱ्या कथित खोट्या नरेटिव्हचा निषेध करण्यासाठी ही रॅली काढण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. सविस्तर वाचा….



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.