![]()
तोरणा किल्ला पाहण्यासाठी हडपसर येथून निघालेल्या पर्यटकांच्या कारचा पुण्याच्या राजगड तालुक्यातील पाबे घाटात भीषण अपघात झाला. घाट चढत असताना अचानक बंद पडलेली कार पावसामुळे निसरड्या झालेल्या रस्त्यावर घसरत थेट सुमारे दीडशे फूट खोल दरीत कोसळली. मात्र, सुदैवाने मागून येणाऱ्या पर्यटकांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि मदतीमुळे या अपघातात कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. मोनीस अरविंद चव्हाडिया, रितिका सिंग आणि उमेश अशी कारमधील प्रवाशांची नावे आहेत. हे तिघे आज पहाटे हडपसर येथून तोरणा किल्ला पाहण्यासाठी कारने निघाले होते. सकाळी सात ते साडेसातच्या सुमारास ते पाबे घाट चढत असताना त्यांची कार अचानक बंद पडली. कार सुरू करत असतानाच घडली दुर्घटना कार बंद पडल्यानंतर ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न सुरू होता. यादरम्यान, पाऊस आणि रस्ता ओलसर असल्यामुळे कार अचानक मागे घसरू लागली. काही क्षणांतच चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या बाजूला असलेल्या सुमारे 150 फूट खोल दरीत कोसळली. या थरारक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. पर्यटकांच्या मदतीमुळे टळला अनर्थ अपघाताची माहिती मिळताच मागून येणाऱ्या काही पर्यटकांनी क्षणाचाही विलंब न करता मदतीसाठी तातडीने धाव घेतली. प्रशासकीय यंत्रणा किंवा रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचेपर्यंत या सतर्क पर्यटकांनी त्यांच्याकडील दोरीच्या मदतीने धाडस दाखवत कारमधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले आणि सुरक्षित ठिकाणी आणले. वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार यानंतर स्थानिक रेस्क्यू टीमने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य पूर्ण केले. अपघातात किरकोळ जखमी झालेल्या तिन्ही प्रवाशांना पुढील उपचारासाठी वेल्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना पुणे शहरात पाठवण्यात आले. हे ही वृत्त वाचा
सहआरोपीकडे वकील नाही:केतन अग्रवाल खून खटला; ‘ई-साक्षी’ पुराव्यांवरून वाद, 17 नोव्हेंबरपर्यंत सुनावणी तहकूब
बहुचर्चित केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या खटल्याची सुनावणी शनिवारी वडगाव मावळ न्यायालयात सुरू झाली. विशेष सरकारी वकील म्हणून ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम स्वतः हजर राहिले. मात्र, तिसरा सहआरोपी रितेश हांगे याच्याकडे वकील नसल्याने आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या (‘ई-साक्षी’) प्रतींवरून बचाव पक्षाने आक्षेप घेतल्यामुळे न्यायालयाने पुढील सुनावणी १७ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली. वाचा सविस्तर
Source link