Headlines

हिंगोली पोलिसांचा मोठा निर्णय:सर्वाधिक अपघात होणाऱ्या 'प्राइम टाइम'मध्ये जिल्ह्याच्या सर्व मार्गांवर होणार नाकाबंदी!




हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होत असून चार वर्षात 679 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. बहुतांश अपघात हेल्मेट नसल्याने झाले आहेत. या शिवाय सायंकाळच्या वेळेतच बहुतांश अपघात झाल्याने आता सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. अपघाताच्या ठिकाणी वाहने हळू चालवली जावीत यासाठी बॅरीकेट उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यात मागील चार वर्षात अपघाताच्या संख्येत सातत्याने वाढ होऊ लागली आहे. पुर्वी रस्त्यावर खड्डे असल्यामुळे अपघात होत होते. मात्र आता रस्ते चांगले झाल्यानंतर वाहने भरधाव वेगाने चालवली जात असल्याने अपघात होत असल्याचे चित्र आहे. यामध्ये दुचाकी वाहनांचाही समावेश आहे. जिल्ह्यातील अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस अधिक्षक निलाभ रोहन, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, वाहतूक शाखेचे निरीक्षक शरद मरे यांनी दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती केली आहे. हेल्मेट परिधानकरून वाहन चालविणाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यात मागील चार वर्षात झालेल्या अपघातात 679 जणांनी प्राण गमावले असून 447 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस विभागाने या अपघाताचे विश्‍लेषन केल्यानंतर दुपारी तीन ते सायंकाळी सहा यावेळेतील अपघातात 107 जणांचा मृत्यू झाला तर 87 जण जखमी झाले. सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत 205 जणांचा मृत्यू झाला तर 139 जण जखमी झाले तर रात्री नऊ ते बारा यावेळेत 93 जणांचा मृ्त्यू झाला तर 51 जण जखमी झाले. या प्रकारानंतर आता हिंगोली जिल्हयातील सर्वच मार्गावर सायंकाळी सहा ते रात्री नऊ यावेळेत नाकाबंदी केली जाणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अपघात प्रवण क्षेत्रात बॅरीकेट लावले जाणार असून त्यामुळे वाहन चालकांना वाहनांची गती कमी करावी लागणार आहे. त्यामुळे अपघात टाळण्यास मदत होणार आहे. या शिवाय वाहनांची तपासणीही केली जाणार असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यात वर्षनिहाय झालेल्या अपघातातील मृत्यू व जखमी पुढील प्रमाणे सन 2023 मध्ये 160 जणांचा मृत्यू तर 93 जण जखमी. सन 2024 मध्ये 198 जणांचा मृत्यू 123 जखमी. सन 2025 मध्ये 233 जणांचा मृ्त्यू 180 जखमी तर सन 2026 मध्ये आता पर्यंत 88 जणांचा मृ्त्यू झाला असून 51 जण जखमी झाले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *