Headlines

Height is only 2.5 feet, but price is over 10 lakhs; The craze for the world’s smallest ‘Punganur’ cows is growing in Jalgaon


जगातील सर्वांत लहान आणि दुर्मिळ देशी गोवंश असलेल्या ‘पुंगनूर’ गायीची भुरळ आता महाराष्ट्राला पडली आहे. जळगाव शहरात या चिमुकल्या गायीचे आकर्षण वेगाने वाढत आहे. अवघी अडीच फूट उंची असलेल्या एका गायीची किंमत १० लाख रुपयांपर्यंत जाते, तर तिच्या दुधाला तब्ब

.

मूळच्या आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील असलेल्या या गायींचे ‘अल्ट्रा ड्वार्फ’ (२४ ते २८ इंच उंची) आणि ‘ड्वार्फ’ (२८ ते ३६ इंच उंची) असे दोन वाण आहेत. या गायींना इतर जनावरांच्या तुलनेत खूप कमी चारा लागतो. दररोज अवघा ३ ते ५ किलो हिरवा चारा, सुका चारा आणि थोडे पशुखाद्य यांच्यावर त्या राहू शकतात. पुंगनूर गायीची किंमत तिची उंची, वय आणि शुद्धतेवर ठरते. शुद्ध ड्वार्फ गायींसाठी ३ ते ५ लाख, तर अतिदुर्मिळ ‘अल्ट्रा ड्वार्फ’ गायींसाठी ५ ते १० लाखांहून अधिक रक्कम मोजावी लागते.

दुधात फॅटचे प्रमाण सर्वाधिक

सर्वसाधारण देशी गायींच्या दुधात फॅटचे प्रमाण सुमारे ४ टक्के असते. मात्र, पुंगनूर गायीच्या दुधात ७ ते ९ टक्के फॅट आणि ४ टक्के प्रोटीन असते. त्यामुळे या दुधाला बाजारात विशेष मागणी आहे. जळगावात जिल्हाधिकारी रोहन घुगे, ॲड. केदार आणि अंजली भुसारी यांच्यासह काही व्यापाऱ्यांनी या गायी पाळल्या आहेत. या गायींच्या औषधी गुणधर्म असलेल्या शेण आणि गोमूत्रालाही मागणी आहे.

प्रजननात तांत्रिक अडचणी

या गायींच्या प्रजननासाठी मोठ्या अडचणी येतात. जळगावात “आयव्हीएफ’ची सुविधा नाही. शरीराच्या लहान बांध्यामुळे कृत्रिम रेतन करणेही कठीण जाते. त्यामुळे नैसर्गिक प्रजननावर अवलंबून राहावे लागते. मात्र, शुद्ध पुंगनूर जनावरांची संख्या मर्यादित असल्याने जवळच्या रक्तसंबंधात प्रजनन होण्याचा धोका आहे. -डॉ. नीलेश चोपडे, पशुवैद्यकीय अधिकारी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *