![]()
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या २०२५-२६ या मूल्यमापन वर्षात किकवारी ग्रामपंचायतीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कामगिरीची दखल घेत जिल्हा परिषद ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या वतीने ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण रामचंद्र सावंत यांना सन्मानपत
.
संयुक्त राष्ट्रसंघाच्या शाश्वत विकासासाठीच्या जागतिक परिवर्तन कार्यक्रम २०३० अंतर्गत ‘सर्वांना सोबत घेऊन चला’ या संकल्पनेला अनुसरून राज्य शासनामार्फत हे अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावर पारदर्शक प्रशासन, लोकसहभाग, मूलभूत सुविधा, शाश्वत विकास आणि सर्वसमावेशक उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास साधणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. या अभियानाच्या मूल्यमापनात किकवारी ग्रामपंचायतीने उत्कृष्ट कामगिरीची नोंद केली. त्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण सावंत यांना जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा फडोळ आणि बागलाणचे गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला.