Headlines

पुढच्या दारातून प्रवेश मिळेना, म्हणून चोर खिडकीतून एन्ट्री:गोकुळमधील हस्तक्षेपावरून विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात




कोल्हापूरच्या ‘गोकुळ दूध संघा’च्या निवडणुकीतील राज्य सरकारच्या हस्तक्षेपावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीका केली आहे. “सत्तेच्या हव्यासापोटी कायद्याची मोडतोड करून गोकुळ लुटण्याचा आणि बरबाद करण्याचा हा डाव आहे. पुढच्या दारातून प्रवेश मिळाला नाही, म्हणून आता चोरासारखं मागच्या खिडकीतून शिरून सत्ता बळकावण्याचा प्रकार सुरू आहे,” असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री हसन मुश्रीफ यांचा ‘कोरम’चा दावाही फेटाळून लावला. ‘कमिशनखोरीतून गोकुळ लुटण्याचा डाव’ वडेट्टीवार म्हणाले, याचा सरळ अर्थ असा आहे की, कायद्याला तोडून-मोडून आणि जनाधाराचा अवमान करून केवळ सत्तेच्या हव्यासापोटी गोकुळ लुटले जात आहे. जसं राज्य आणि देश कमिशनखोरीमध्ये बरबाद केलाय, तसंच करण्यासाठी यांना गोकुळची सत्ता हवी आहे. सत्तेसाठी यांनी खूप प्रयत्न केले; तीन-तीन मंत्री, बारा-बारा आमदार, खासदार… सगळे पणाला लावले. पण अपयश आल्यावर आता पुढच्या दारातून प्रवेश मिळत नाही, तर चोर खिडकी शोधायची आणि चोरासारखं मागच्या खिडकीतून आतमध्ये शिरून सत्ता बळकावायची, असे सुरू आहे.” मुख्यमंत्र्यांचा ‘कोरम’चा दावा फेटाळला मुख्यमंत्र्यांनी आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी ‘कोरम अभावी बैठक रद्द झाली असती, तर निवडणूकच रद्द झाली असती’ असा दावा केला होता. यावर वडेट्टीवारांनी स्पष्टीकरण देत हा दावा फेटाळून लावला. “असं कुठेही नाहीये. पहिल्या बैठकीला कोरम पूर्ण झाला नसता, तरी बहुमताने अध्यक्ष निवडता येतो. न्यायालयानेही स्पष्ट निर्देश दिले आहेत की, १० तारखेला २५ च्या २५ संचालकांनी उपस्थित राहावे. त्यामुळे उपस्थित न राहण्याचा किंवा निवडणूक रद्द होण्याचा प्रश्न येतोच कुठे? त्याचा काहीही संबंध नाही. हा केवळ गोकुळची सत्ता मिळवण्यासाठी महायुतीने केलेला उपद्व्याप आहे, हे आता लपून राहिलेले नाही. पण आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे, ते जनमताचाच कौल राखतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राजू शेट्टींच्या आंदोलनाला भक्कम पाठिंबा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या ऊस आंदोलनावर बोलताना वडेट्टीवार यांनी त्यांच्या लढ्याचे कौतुक केले. “राजू शेट्टी हे शेतकऱ्यांसाठी लढणारे चांगले नेते आहेत. त्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी अनेक आंदोलने केली आहेत. आज बाजारात ५० ते ६० रुपये किलो साखर विकली जात आहे, मग शेतकऱ्यांच्या ऊसाला भाव का मिळू नये? तो मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांचे नुकसान करून केवळ कारखानदारांनी मजा करायची, यात शेतकऱ्यांचे हित कुठे आहे?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी राजू शेट्टींच्या भूमिकेला थेट पाठिंबा दर्शवला. ————– हेही वाचा.. गोकुळमध्ये लोकशाही टिकवण्यासाठीच शासननियुक्त संचालकांचा निर्णय: आता गोकुळचा विषय संपला; तर सतेज पाटलांनी चेअरमन करावा- हसन मुश्रीफ
गोकुळ दूध संघात निवडून आलेल्या 25 संचालकांना जर सत्ता द्यायची असेल आणि त्यांना काम करू द्यायचे असेल, तर लोकशाही टिकवण्यासाठी आमच्याकडे शासननियुक्त सदस्यांचा निर्णय घेण्याव्यतिरिक्त दुसरा कोणताही मार्ग नव्हता, असे स्पष्टीकरण राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहे. तसेच, आमच्या सहकाऱ्यांना विरोधी पक्षात बसण्याचा कौल मिळाला आहे; मग आमचे लोक त्यांचा चेअरमन करण्यासाठी का जातील? कायद्यात 14 सदस्यांच्या कोरमची अट असल्यानेच हा प्रश्न निर्माण झाला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *