Headlines

विद्यार्थ्यांची दिव्यांगांना मदत:ज्ञानदीप कॉन्व्हेंटमधील विद्यार्थ्यांचा दिव्यांग व शेतकऱ्यांसाठी उपक्रम




दिवाळीचा सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता समाजातील वंचित घटकांना मदतीचा हात देण्यासाठी दिव्यांग सोशल फाउंडेशनतर्फे ‘एक हात सहकार्याचा’ हा विशेष उपक्रम संपूर्ण अकोल्यात राबवला जात आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून दिव्यांग बांधव व गरजू शेतकऱ्यांना सहकार्य करण्यात येत आहे. या सामाजिक कार्याची दखल घेऊन मोठी उमरी येथील ज्ञानदीप कॉन्व्हेन्टतर्फे आगळीवेगळी आणि पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आला. मुख्याध्यापिका स्नेहल धोत्रे व सचिव मंजूषा घोगरे यांनी दिव्यांग सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विशाल कोरडे यांना कॉन्व्हेंटमध्ये आमंत्रित केले होते. यावेळी शाळेतील बालगोपाळांनी यंदा फटाके न फोडण्याचा संवेदनशील संकल्प केला. फटाक्यांवर होणारा अनावश्यक खर्च टाळून तो निधी दिव्यांग आणि शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतला. चिमुकल्यांनी हा संपूर्ण निधी एकत्रित करून शाळेच्या मुख्याध्यापिकांकडे सुपूर्द केला. त्यानंतर मुख्याध्यापिका धोत्रे यांनी चेक स्वरूपात ही मदत दिव्यांग सोशल फाउंडेशनकडे सुपूर्द केली. मुख्याध्यापिका धोत्रे यांनी डॉ. कोरडे यांच्या सामाजिक कार्याला शुभेच्छा देत संस्थेच्या आगामी प्रत्येक उपक्रमात ज्ञानदीप कॉन्व्हेंट सदैव सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली. आयोजनासाठी उपमुख्याध्यापिका मंजुळा राहुडकर, चैताली गोटूकडे, रिता वानखडे, संध्या शिरसाट, गायत्री शिवलकर, पल्लवी वाघ, वर्षा जंगले व गोमासे यांनी परिश्रम घेतले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *