![]()
राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या ५ हजार रुपयांच्या मदतीवरून संताप व्यक्त करत, अंधारे यांनी आज बीडच्या परळीमध्ये सरकारविरोधात ‘भीक मांगो’ आंदोलन पुकारले आहे. तसेच, ‘देवेंद्र फडणवीस हे सत्तेपेक्षा विरोधी बाकावरच जास्त शोभून दिसतात’, असा टोलाही त्यांनी लगावला आहे. ‘५ हजार कुठे पुरणार? आम्हीच सरकारला भीक देतो’ राज्य सरकारने नुकतीच शेतकऱ्यांना ५ हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. यावर टीका करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, “शासनाने जे काही ५ हजार रुपये देऊ केले आहेत, ते ५ हजार कुठे पुरणार आहेत? आणि ५ हजार तरी कशाला देताय? तुम्हाला भीक लागलीये का? तर आम्ही देतो ना. आम्हीच भीक मागतो आणि ५ हजार रुपये तुम्हाला जमा करून देतो.” सरकारच्या या तुटपुंज्या मदतीचा निषेध करण्यासाठी आज परळीत ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती अंधारे यांनी एकना वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. ‘कर्जमाफी फक्त उद्धव ठाकरेंच्या काळातच झाली’ शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून अंधारे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले. “शेतकऱ्यांची कर्जमाफी एकदाच झाली होती, जेव्हा उद्धव साहेब या राज्याच्या सन्माननीय मुख्यमंत्रीपदी विराजमान होते. त्यानंतरच्या काळामध्ये कोणतीही कर्जमाफी झाली नाही,” असा दावा सुषमा अंधारे यांनी केला. देवेंद्र फडणवीसांना खोचक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधताना अंधारे यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्या म्हणाल्या, “देवेंद्रजी सरकारमध्ये असण्यापेक्षा विरोधी बाकावर असल्यावर जास्त शोभून दिसतात. कारण ते जेव्हा विरोधी बाकावर असतात, तेव्हा लोकांची जास्त चांगली कामे होतात, ते खूप आक्रमकपणे भांडतात.” सत्तेत आल्यावर फडणवीस आक्रमकपणे जनतेचे प्रश्न सोडवत नसल्याचा अप्रत्यक्ष आरोप त्यांनी यावेळी केला. ——————- हेही वाचा.. कोल्हापुरात सतेज पाटलांचा संघर्ष मोर्चा:गोकुळमधील शासननियुक्त सदस्यांच्या निर्णयाला काँग्रेसचा विरोध, मविआच्या घटक पक्षांचा मोर्चाला पाठिंबा
कोल्हापूरच्या राजकीय आणि सहकार क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेच्या ‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीवरून आता मोठा संघर्ष पेटला आहे. गोकुळ दूध संघात सतेज पाटील गटाला बहुमत मिळालेले असताना, राज्य सरकारने अध्यक्ष निवडीसाठी अतिरिक्त ४ शासन नियुक्त संचालकांच्या वाढीचा अध्यादेश काढला आहे. या निर्णयामुळे अध्यक्षपद महायुतीकडे जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सरकारच्या या हस्तक्षेपाविरोधात काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्या ‘समविचारी आघाडी’ने अत्यंत आक्रमक भूमिका घेतली असून, आज कोल्हापुरात भव्य ‘संघर्ष मोर्चा’ची हाक दिली आहे. सविस्तर वाचा
Source link
5 हजार कशाला देताय? आम्हीच भीक मागून सरकारला देतो:शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून सुषमा अंधारेंचा सरकारवर घणाघात, परळीत 'भीक मांगो' आंदोलन