![]()
पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर वंदे भारत एक्सप्रेसचा डबा रेल्वे रुळावरून घसरला. CSMT ते सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्रमांक 22225) ही पुणे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मवर प्रवेश करत असताना सायंकाळी ७:३० वाजता डायमंड क्रॉसिंगवर चौथ्या डब्याची एक ट्रॉली घसरली. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. घटनास्थळावरील व्हिडिओ… वंदे भारत ट्रेन रुळावरून घसरल्याची पहिलीच घटना पुणे स्थानकाच्या यार्ड रिमॉडेलिंग अंतर्गत या क्रॉसिंगच्या उन्नतीकरणाचे काम नियोजित आहे, तेव्हा ट्रेनला किरकोळ अपघात झाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. वंदे भारत ट्रेनमधील सी 15 या कोचमधील सर्व प्रवाशांच्या सोयीसाठी त्यांना दुसऱ्या रेकमध्ये हलविण्याची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, वंदे भारत ट्रेनचा कोच रुळावरुन घसरल्याची ही पहिलीच घटना आहे, यापूर्वी वंदे भारत ट्रेन अचानक बंद पडल्याने दुसऱ्या इंजिनने तिला नेण्यात आले होते. घटनेबाबत अधिकची माहिती अशी की, मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसचा एक डबा आज संध्याकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर प्रवेश करत असताना रुळावरून घसरल्याने एकच खळबळ उडाली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा कुणीही जखमी झालेले नाही. नियमित वेळेनुसार स्थानकात येत असताना अचानक डब्याची चाके रुळाखाली गेल्याचे दृश्यांमधून समोर आले असून, रेल्वे प्रशासनाकडून सध्या युद्धपातळीवर डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम सुरू आहे. या अनपेक्षित घटनेमुळे पुणे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय योजले जात आहेत. ही बातमी अपडेट केली जात आहे…
Source link
वंदे भारत एक्सप्रेसचा अपघात:पुणे स्थानकाजवळ रेल्वे डबा रुळावरून घसरला; कोणतीही जीवितहानी नाही, सर्व प्रवासी सुखरुप