![]()
कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघात शासन नियुक्त संचालक नेमण्याच्या निर्णयावरून राजकारण चांगलेच तापले असून, या निर्णयाला विरोध दर्शवण्यासाठी सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारविरोधात हजारोंचा विराट मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर झालेल्या जाहीर सभेत आक्रमक भूमिका घेत, माजी खासदार राजू शेट्टी यांनी जुने संदर्भ देत सत्ताधाऱ्यांवर जोरदार आगपाखड केली. यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, एवढ्या मोठ्या संख्येने जनता एकवटली आहे. त्यांना वाटले की, पाच हजार ठरावधारकांना मॅनेज करून गोकुळवर कब्जा करता येईल. पण त्यात यश आले नाही. कारण हे कोल्हापूर आहे. मग…कोरमचे नाटक करून बैठका पुढे ढकलण्याचा डाव झाला. आता रडीचा डाव खेळत आहे. रडीचा डाव म्हणजे भाजप आणि त्यांचे पाय चाटणारे मित्र पक्ष..यांना सहकार कधीच कळाला नाही. वैकुंठराव मेहता, विठ्ठलराव विखे पाटील, धनंजयराव गाडगीळ असतील. या नेत्यांनी सहकारची पाळेमुळे रोवली. ती रोवत असताना प्रत्येक सहकारी संस्थेत स्वीकृत सदस्यांची तरतूद करून ठेवली. पण आजपर्यंत स्वीकृत सदस्यांना मतदानाचा अधिकार दिला नाही. पुढे बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, सहकारचा कायदा देखील हेच सांगतो. लोकांमधून निवडून आलेले संचालक असतील. एखाद्या विषयातील तज्ञ नसतील. म्हणून संचालकांना निर्णय घेण्यासाठी निर्णय चुकू नये. कायदेशीर सल्ला देण्यासाठी स्वीकृत संचालकांची संकल्पना आणली. पण आजपर्यंत महाराष्ट्रात स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार नव्हता. महाराष्ट्रातच नव्हे, देशात कुठे नव्हता. कोर्टात आजचा संदेश पोहोचला आहे. कोर्टाने दीडदमडीच्या राजकीय नेत्यांच्या दाबावाखली बळी पडून निर्णय दिला, अत्र या लोकांचा न्यायावरील विश्वास उडाल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे तसेच आता कोर्टाने ड्रोनवरून फोटो मागवून घ्यावेत. भाड्याने आलेले लोक नाहीत. हे आडलेले लोक नाहीत. सर्व लोक गोकुळ वाचवायला आले आहेत. कोल्हापूरकरांनी ठरवले. यांनी एकदा टोल आणला. त्यांचा टोल घालवला. अदानी पॉवर प्रोजेक्ट आणला होता. पण 8000 कोटी रुपयांचा प्रकल्प पळवून लावला. नाशिकचे पाणी गुजरातला, माधुरी हत्ती गुजरातला नेली. ती सुद्धा परत आणली. हा कोल्हापूर जिल्हा हा राजर्षी शाहू महाराजांचा जिल्हा आहे. गोकुळच्या निवडणुकीचे नोटीफिकेशन पुन्हा वाचावे, असेही राजू शेट्टी यांनी म्हटले. या संदर्भातील ही देखील बातमी वाचा.. गोकुळवर प्रशासक आणणे हे सरकारचे सूडबुद्धीचेच राजकारण:कोल्हापुरात संघर्ष मोर्चातून सतेज पाटलांचा महायुतीवर हल्लाबोल गोकुळ दूध संघावरील शासनाच्या हस्तक्षेपाविरोधात आणि ५ अतिरिक्त संचालकांच्या नियुक्तीविरोधात आज कोल्हापुरात काढण्यात आलेल्या महाविकास आघाडीच्या ‘संघर्ष मोर्चा’त काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी अत्यंत आक्रमक आणि घणाघाती भाषण केले. या भाषणात त्यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर जातीवादाचा आणि घराणेशाहीचा आरोप करत थेट हल्लाबोल केला. तसेच, महायुती सरकारने गोकुळमध्ये सूडबुद्धीने प्रशासक आणल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला. वाचा सविस्तर
Source link
भाजप आणि त्यांचे मित्र पक्ष रडीचा डाव खेळतायत:'गोकुळ'वरून राजू शेट्टींचा सत्ताधाऱ्यांवर घणाघात, सहकाराचा दाखला देत सडकून टीका