Headlines

मानवी जीवनात भगवंताचे नामस्मरण आणि चिंतनामध्येच खरी दिवाळी:श्री सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमातील मंदिराचा वर्धापनदिन साजरा



सण-उत्सव हे केवळ आनंद साजरा करण्याचे माध्यम नसून समाजाला एकत्र आणून संत-महात्म्यांच्या विचारांचा लाभ घेण्याची संधी असते. सज्जनांच्या सहवासात राहून वाणी भगवंताच्या चिंतनात आणि नामस्मरणात रमली तर जीवनात नित्य दिवाळीचा आनंद अनुभवता येतो, असे प्रतिपादन ह

.

जीवनातील खरा आनंद हा सज्जनांच्या भेटीत असतो. सण-उत्सवांतून विचारांची देवाणघेवाण, स्नेहभाव आणि परस्पर सहकार्य वाढते. समाजाने दूर लोटलेल्या माणसांच्या पाठीशी उभे राहून त्यांचे दुःख आणि अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणे हाच खरा पुरुषार्थ आहे. मैत्री, संवाद आणि एकोप्यातून अनेक प्रश्न सुटू शकतात, असे त्यांनी सांगितले.

पैशांचा खर्च करताना विवेक बाळगावा. योग्य वेळी आणि योग्य ठिकाणीच पैसा खर्च करावा. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने सर्वांनी सतर्क राहून योग्य नियोजन करावे. संकटाच्या काळात एकमेकांना आधार देत सहकार्य करावे. चांगल्या-वाईट प्रसंगांतूनच माणसाची परीक्षा होत असते. काळाच्या ओघात कठीण दिवसही निघून जातात, असा आशावादी संदेश महाराजांनी दिला.

आश्रमाचे शिक्षक बाळासाहेब झिने यांनी सूत्रसंचालन केले तर महेश गवळी यांनी आभार मानले. संतसेवक नामदेव शिंदे व परिवाराच्यावतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विष्णुपंत ठोसर, गणेश डोंगरे, वसंत बत्तासे, सुभाष गवांदे, संतोष थोरात, ज्ञानदेव शिंदे, गोरख पंचमेढे, अक्षय फोपसे, पसायदान आनंदवन परिवार तसेच रोकडेश्वर भजनी मंडळ, खंबाळा यांनी विविध सेवा दिल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *