Headlines

BJP Warns Shiv Sena Over Ravindra Dhandekar; Pune Political Controversy


चंद्रकांत पाटील यांच्या टीका करणारे रविंद्र धंगेकर यांच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी वेळीच आवर घातला पाहिजे अन्यथा त्यांना भाजपचे कार्यकर्ते योग्य तो धडा शिकवतील, असा इशास भाजप प्रवक्ते अजित चव्हाण यांनी महायुतीमधील मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेला दिला आ

.

अजित चव्हाण म्हणाले की, चंद्रकांत पाटील निश्चित झोळी अडकवून महाराष्ट्रभर फिरले पण त्या झोळीतून त्यांनी असंख्य कार्यकर्ते घडवले ही झोळी पसरून चंद्रकांत पाटील यांनी फार मोठं सामाजिक काम महाराष्ट्रात उभ केले ते दादा कधीच सांगत नाही आणि आम्हाला अभिमान आहे.

धंगेकरांचा धंदा काय?- चव्हाण

अजित चव्हाण म्हणाले की, चंद्रकांत पाटील झोळी अडकवून महाराष्ट्रभर फिरले आणि त्यांनी असं काम उभं केलं की यातून भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रात सत्ता येण्यास मदत झाली रविंद्र धंगेकरांचा असा काय धंदा आहे? की ते निवडणूक शपथपत्रात करोडोची संपत्ती दाखवतात हेही त्यांनी सांगावे खंडणीखोर असलेल्या धंगेकर यांनी नैतिक पातळी ओलांडून चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेली टीका ही आम्हाला खोलवर दुखावणारी आहे शिवसेना नेतृत्वाने धंगेकरांना वेळीच आवर घालावा, असा इशारा अजित चव्हाण यांनी दिला आहे.

रविंद्र धंगेकर काय म्हणाले?

गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून भाजप नेते चंद्रकांत पाटील आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते रविंद्र धंगेकर यांच्यातील वाकयुद्ध अधिक तीव्र झाले आहे. चंद्रकांत पाटील यांनी काल गोकुळसंदर्भात काढलेल्या मोर्च्यात जी भाषा वापरली, ती पूर्णपणे चुकीची आहे. चंद्रकांत पाटील हे कायम दादागिरी करत असतात, ही त्यांची जुनीच सवय आहे, असा थेट आरोप रविंद्र धंगेकर यांनी केला आहे.

चंद्रकांतदादा तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू आहात का?

रविंद्र धंगेकर म्हणाले की, चंद्रकांत पाटील म्हणाले की, सतेज पाटलांचे वडील स्कूटरवरून फिरायचे. पण तुम्ही स्वतः शबनम बॅग घेऊन हॉटेलच्या बाहेर कोणी चहा पाजतो का, याची वाट पाहत उभे राहायचात ना? तुमची ही परिस्थिती या महाराष्ट्राने पाहिली आहे. तुम्ही काय किर्लोस्करांचे नातू आहात का? चंद्रकांत पाटील यांना सर्वच पक्षांत काय चालले आहे हे माहित असते, त्यांना विचारल्याशिवाय कोणी काही करतच नाही, असा टोला लगावत, चंद्रकांत पाटलांनी कोथरूडऐवजी कोल्हापुरातून निवडणूक लढवून दाखवावी, तिथून लढण्यात खरी मजा आहे, असे आव्हानही त्यांनी दिले.

हे ही वृत्त वाचा

छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात दमदाटी चालणार नाही

रविंद्र धंगेकर म्हणाले की, एक काळ असा येईल की, लोक चौका-चौकात तुम्हाला थांबवून प्रश्न विचारतील; तो काळ आता फार दूर नाही. हा छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात अशी दमदाटी खपवून घेतली जाणार नाही. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *