Headlines

फिशरीज हबसाठी अद्याप कंत्राटदार मिळेना:कोरोनापासून काम सुरू तरी हब अजुनही सुरू होईना; दिरंगाईचा माेठा फटका




महानगरपालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प फिशरीज हब गेल्या पाच वर्षांपासून रखडला आहे. विशेष बाब अशी की, या प्रकल्पाचे बांधकाम पूर्ण झाले असून यंत्रसामग्री, पाण्याची सोय, शीतगृह अशी व्यवस्थाही येथे निर्माण करण्यात आली आहे. परंतु, तांत्रिकदृष्ट्या सक्षम तसेच फिशरीज हब सांभाळण्यासाठी आवश्यक अनुभव असलेली कंत्राटदार कंपनीच पशु वैद्यकीय विभागाला मिळत नसल्यामुळे अजुनही फिशरीज हबचे काम सुरू झाले नाही. मनपाने याआधी निविदा प्रक्रिया राबवली. पशू शल्य चिकित्सक बदलले. तरी अजुनही कंत्राटदार कंपनीचा शोध मनपा प्रशासनाला घेता आला नाही. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील मासोळी विक्रेत्यांना ताजी मासोळी तसेच नागरिकांना ताजे तसेच फ्रिज केलेले मासे खायला मिळेनासे झाले आहे. स्थानिक मासोळी उत्पादकांचे ५० टक्के उत्पादन हे टिकवून ठेवण्याची व्यवस्था नसल्यामुळे वाया जात आहे. तसेच मुंबईसह इतर महानगरांपर्यंत ते पाठवण्याचा खर्च जास्त असल्यामुळे शहरातच जर हे मासे टिकवण्याची यंत्रणा असली तर मासे खराब होणार नाहीत, तसेच मासोळी विक्रेत्यांना उत्तम रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. तसेच नागरिकांनाही ताजे व उत्तम मासे खायला मिळतील. कारण, येथे ठोक व चिल्लर विक्रीचीही सोय राहणार आहे. बैठकीनंतरही घोडे अडलेलेच फिशरीज हबचे बांधकाम, तांत्रिक काम, वीज जोडणी, पाण्याची व्यवस्था, आवश्यक यंत्रे असे सर्वकाही स्थापित झाले आहे. त्यामुळे स्थानिक आमदारांनी फिशरीज हब सुरू करण्याचे मनपाच्या पशू विभागाला आदेश दिले. त्यावेळी कंत्राटदार कंपनीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले. परंतु, अजूनही कंत्राटदार कंपनीचा शोध लागला नाही. कंत्राटदार कंपनीचा शोध सुरू ^मनपाद्वारे फिशरीज हब सुरू करण्यासाठी कंत्राटदार कंपनीचा शोध सुरू आहे. मत्स्यव्यवसायासाठी आवश्यक अनुभव असलेली कंपनी यासाठी आवश्यक आहे. कोणालाही फिशरीज हब देता येणार नाही. याबाबत तांत्रिक माहितीही आवश्यक आहे. – संतोष देशमुख, पशू शल्य चिकित्सक, मनपा.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *