Headlines

आदिवासी पाड्यांवर दिवाळीनिमित्त लेखापालांकडून मिठाई, कपडे वाटप:‘छोटी कृती, मोठा प्रभाव” या ब्रीदवाक्याखाली आयसीएआय, “विकासा” यांचा पुढाकार



दिवाळी सणाचा आनंद समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने, “द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया’च्या (आयसीएआय) डब्ल्यूआयआरसी अकोला शाखा, विकासा अकोला शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने अकोट परिसरातील आदिवासी बांधवांसाठी एक विशेष ‘

.

“छोटी कृती, मोठा प्रभाव’ हे ब्रीदवाक्य समोर ठेवून ही सामाजिक मोहीम राबवण्यात आली. दिवाळीच्या सणाचे औचित्य साधून अकोट परिसरातील गरजू आदिवासी कुटुंबांना कपडे देण्यात आले. लहान मुलांना मिष्टान्न, खाऊचे वाटप करण्यात आले. समाजात परस्परांप्रती आपुलकी, सामाजिक बांधिलकी, मदतीची भावना रुजवून एक संवेदनशील, सशक्त समाज घडवण्याचा संदेश उपक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. या उपक्रमाला आयसीएआय अकोला शाखेचे चेअरमन सीए रोमिल सोजतिया, “विकासा’ चेअरमन सीए धीरज चांडक यांची प्रमुख उपस्थिती लाभली. याप्रसंगी डब्ल्यूआयआरसी अकोला शाखा समितीचे सदस्य तसेच विकासा मॅनेजमेंट कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते.

त्यांच्या सक्रिय सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. कपडे दान मोहिमेला अकोल्यातील सीए सदस्य, सीए विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उपक्रमाच्या यशस्वितेसाठी योगदान देणाऱ्या सर्व दात्यांचे, सदस्यांचे, सहभागींचे आयोजकांनी आभार मानले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *