Headlines

दिवाळीच्या सुट्ट्यांतील शिक्षकांचे प्रशिक्षण पुढे ढकलण्याची मागणी:वरिष्ठ,निवडश्रेणी प्रशिक्षणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



दिवाळीसारख्या महत्त्वाच्या सणाच्या सुट्ट्यांमध्ये शिक्षकांसाठी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रशिक्षण आयोजित करण्याच्या निर्णयाविरोधात फुले-शाहू-आंबेडकर टीचर्स असोसिएशन (पॅक्टो), अकोला यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. १३ ते २२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत आयोजित

.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ रोजीच्या पत्रानुसार प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयांतील शिक्षकांसाठी हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. मात्र, वर्षभर शैक्षणिक, प्रशासकीय, निवडणूकविषयक व विविध अशैक्षणिक कामांचा प्रचंड ताण सहन करणाऱ्या शिक्षकांना दिवाळीच्या सुट्ट्यांमध्येही प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याची सक्ती करणे अन्यायकारक व अव्यवहार्य असल्याचे पॅक्टोने म्हटले आहे. प्रशिक्षणाला विरोध नाही. मात्र शिक्षकांच्या सुट्ट्यांवर गदा नको, अशी स्पष्ट भूमिका संघटनेने मांडली. शिक्षकांनाही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडण्याचा, सण साजरा करण्याचा, कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याचा अधिकार आहे. प्रशासनाने शिक्षकांच्या मानवी भावना व कौटुंबिक जीवनाचा विचार करणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी प्रा. डॉ. विजय आठवले, “पॅक्टो”चे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. बाळकृष्ण खंडारे, महासचिव प्रा. सुनील कांबळे, प्रा. शैलेश इंगळे, प्रा. विवेक पांडे, प्रा. सज्जन जाधव, प्रा. डॉ. गणेश पोटे, अनिल गवई, विद्याधर मोहोड, संदेश गवई इत्यादी उपस्थित होते.

या आहेत मागण्या; प्रशिक्षणासाठी सक्ती नको पॅक्टोने काही प्रमुख मागण्या केल्या आहेत. यात प्रशिक्षण तत्काळ रद्द करावे. दिवाळीच्या सुट्ट्या वगळून सोयीच्या कालावधीत प्रशिक्षण आयोजित करावे. प्रशिक्षणासाठी उपस्थितीबाबत कोणतीही सक्ती किंवा दबाव टाकू नये. नियोजन करताना शिक्षक संघटनांच्या प्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून संबंधित शासन व शिक्षण विभागाकडे प्रशिक्षण पुढे ढकलण्याची शिफारस करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *