Headlines

तरुणाईचा कमी वजनाच्या 9 ते 18 कॅरेट दागिन्यांकडे कल:पारंपरिक पिवळ्या सोन्याऐवजी ‘व्हाइट गोल्ड”, फॅशन ज्वेलरीला ग्राहकांनी दिली पसंती



गतवर्षीच्या तुलनेत यंदा सुवर्ण बाजारात खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असली, तरी ग्राहकांची सरासरी खरेदी क्षमता घटल्याचे दिसून आले. तसेच पारंपरिक पिवळ्या सोन्याऐवजी कमी वजनाचे ९, १४ आणि १८ कॅरेटचे दागिने, व्हाइट गोल्ड, रोज गो

.

यंदा ९, १४ आणि १८ कॅरेटच्या हलक्या वजनाच्या दागिन्यांना आणि विशेषतः मंगळसूत्रांना ग्राहकांची जोरदार मागणी राहिली. यामध्ये ९ कॅरेटच्या दागिन्यांची मागणी इतकी प्रचंड होती की अवघ्या चार दिवसांत शोरूममधील संपूर्ण स्टॉक पुन्हा भरून घ्यावा लागल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. नाणी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी सुवर्ण व्यावसायिकांनी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. नाणी खरेदी करताना ग्राहकांनी दिलेली मजुरी भविष्यात जेव्हा ते दागिने खरेदी करतील, तेव्हा त्या दागिन्यांच्या मजुरीतून पूर्णपणे वजा करून दिली जाणार आहे.

‘रोज गोल्ड’चा नवा ट्रेंड; आकर्षक, टिकाऊ अन् ट्रेंडी नवीन दांपत्य आणि तरुण पिढीला २४ कॅरेटचे पारंपरिक पिवळे सोन्याचे जड दागिने घालणे फारसे पसंत नाही. त्याऐवजी अधिक मजबूत, आकर्षक, टिकाऊ, ट्रेंडी दिसणाऱ्या व्हाइट गोल्ड, रोज गोल्ड, गेरू पॉलिश दागिन्यांना ग्राहकांनी पसंती दिली.

ग्राहक वाढले, विक्री सारखी ^गतवर्षी एका शोरूममध्ये ७५० ग्राहकांनी खरेदी केली होती, तर यंदा ही संख्या वाढून ८५० वर पोहोचली आहे. मात्र, एकूण विक्रीची रक्कम गतवर्षाइतकीच राहिली आहे. पूर्वी जे ग्राहक २५ ग्रॅम सोन्याची खरेदी करत होते, त्यांनी यंदा १५ ते २० ग्रॅम खरेदीला प्राधान्य दिले. ऐनवेळची गर्दी टाळण्यासाठी जवळपास २५ टक्के ग्राहकांनी १५ दिवस आधीच बुकिंग करून सणाच्या दिवशी डिलिव्हरी घेणे पसंत केले आहे. – नितीन खंडेलवाल, सुवर्ण व्यावसायिक, अकोला.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *