Headlines

कामगार, आदिवासी कुटुंबांतील मुलांंना दिवाळीनिमित्त फराळ अन् मिठाईचे वाटप:तांदळी खुर्दमध्ये उपक्रम, ‘छत्रपती करंडक’ आयोजन समितीचा पुढाकार



दिवाळी म्हटली की रोषणाई, फराळ, मिठाई आणि आनंदाचा उत्सव डोळ्यांसमोर येतो. मात्र, दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी, शेतमजूर, कामगार आणि आदिवासी कुटुंबांतील मुलांसाठी सणाचा आनंद अनेकदा आर्थिक अडचणींमुळे मर्यादित राहतो. अशा मुलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलव

.

पातूर तालुक्यातील तांदळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सामाजिक दिवाळी हा उपक्रम उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, केवळ शालेय साहित्य देण्यापुरता उपक्रम मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड, चिकित्सक दृष्टिकोन आणि सामाजिक जाणीव निर्माण व्हावी, या उद्देशाने प्रत्येक विद्यार्थ्याला एक वैचारिक पुस्तकही भेट देण्यात आले.

समाजातील सक्षम घटकांनी गरजू कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी सामूहिकपणे स्वीकारली, तर शिक्षणातील अडथळे कमी करण्यास मदत होऊ शकते, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. प्रा. डॉ. निलेश पाकदुने यांचे मार्गदर्शन लाभले. तांदळी खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद आणि ग्रामस्थांनी उपक्रमाच्या यशस्वितेसाठी सहकार्य केले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अक्षय राऊत, प्रथमेश इंगळे, पूर्वा सरोदे, प्रगती सरोदे, राश्मिता, प्रतीक, रुपाली दुतोंडे, गोपाल गावंडे, दिनेश सरप, शेखर साबळे, रश्मी गावंडे, हृषीकेश इंगळे, प्रांजली देशमुख, गौरी सरोदे, अजय कवडे, प्रज्ञा मुंडे, विशाल वानखडे, अंकुश इंगळे यांनी परिश्रम घेतले.

वह्या, पेन, पेन्सिल आणि रंगपेटी शैक्षणिक साहित्याबरोबरच विद्यार्थ्यांना वैचारिक पुस्तकांची भेट देण्यात आली. शिक्षण म्हणजे केवळ परीक्षेपुरते ज्ञान नसून विचार करण्याची क्षमता, वाचनाची आवड आणि सामाजिक जाणीव विकसित करणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे पुस्तकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या विचारविश्वाला चालना देण्याचा गरज आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *