![]()
सर्वात महत्त्वाच्या दिवाळी सणाला गावाला ये-जा करणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) मोर्शी आगाराने प्रवाशांच्या सोयीसाठी मोर्शीहून शेगाव, यवतमाळ, अकोला, छत्रपती संभाजीनगर, पुण्यासाठी अतिरिक्त पा
.
अतिरिक्त बस फेऱ्या सुरु केल्यामुळे भाऊबीजेसाठी जाणाऱ्या बहिणींची मोर्शी बसस्थानकावर गर्दी होत आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये महिला अधिकारी-कर्मचारी आणि शालेय विद्यार्थिनी भावाला औक्षण करण्यासाठी आपापल्या गावी जातात. लाडक्या बहिणींशिवाय इतर नागरिकसुद्धा मोठ्या संख्येने आपापल्या गावी आणि नातेवाईकांकडे जाण्यासाठी प्रवास करतात. त्यामुळे बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढते. ही बाब लक्षात घेता नियमित बस फेऱ्यांवर अतिरिक्त ताण येऊ नये आणि प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोर्शी आगाराचे व्यवस्थापक ठाकरे यांनी विशेष नियोजन केले आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित व्हावा, यासाठी आगारात स्वच्छता तसेच आवश्यक सोयी-सुविधांचीही तयारी करण्यात आली आहे. प्रवाशांनी अवैध व खासगी वाहनांमधून धोकादायक प्रवास करण्याऐवजी एसटीच्या सुरक्षित बससेवेचा लाभ घ्यावा असे आवाहनसुद्धा आगार प्रशासनाने केले आहे. ग्रामीण भागातील या मार्गांवर चालवण्यात येणाऱ्या नव्या बसेसमुळे प्रवाशांना अधिक आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार असून, ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि कामानिमित्त दररोज प्रवास करणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.परिसरातील नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, भविष्यात आणखी बसेस उपलब्ध करून देण्याची अपेक्षा व्यक्त केली.
‘त्या’ तीन नियमित फेऱ्या सुरुच मोर्शी आगारातून दररोज सकाळी ६.१५ वाजता मोर्शी ते बुलढाणा, सकाळी ६.१५ वाजता मोर्शी ते नागपूर तसेच दुपारी १.३० वाजता मोर्शी ते माहूर या तीन नियमित बस फेऱ्या सुरूच आहे. याशिवाय गर्दीचा हंगाम लक्षात घेऊन शेगाव, यवतमाळ,अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या प्रमुख मार्गांवर जादा बस फेऱ्या सोडण्यात येत आहेत.