संजय राऊतांनी बोलताना थोडा विचार करून बोलले पाहिजे. त्यांना भांडूपच्या गाढव नाक्यावर उभे राहून आरडाओरड करण्याची सवय असल्याने ते इतरांना कुत्रा किंवा इतर शब्द वापरतात. महाराष्ट्राच्या राजकारणात असे शब्द वापरण्याची सुरुवात राऊतांनी केली आहे. कोण कुत्रा
.
नवनाथ बन म्हणाले की, गोकुळ प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायद्याची बाजू घेतली आहे. गोकुळवर प्रशासक येऊ नये म्हणून त्यांनी 4 शासकीय सदस्य नेमले. गोकुळ कुठेही नेण्याचा प्रयत्न नाही. गोकुळ डी. वाय. पाटील ट्रस्टमध्ये नेण्याचा जो प्रयत्न केला जात होता, त्याविरोधात महायुती उभी आहे. गोकुळला गुजरातमध्ये घेऊन जाण्याचा कोणाचाही प्रयत्न नाही. गोकुळचे डी. वाय. पाटील प्रायव्हेट लिमिटेडमध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न देवाभाऊ आणि महायुती यशस्वी होऊ देणार नाही.
राऊतांनी त्यांच्यावर बोलू नये
नवनाथ बन म्हणाले की, कोथरूडमधून चंद्रकांत पाटील हे दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत; पण संजय राऊत राहत असलेल्या भांडूपमध्ये त्यांना साधा नगरसेवक निवडून आणता आला नाही, तिथे भाजपचा नगरसेवक निवडून आला आहे. महाविकास आघाडीच्या काळात रोज 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देऊन जे 90 हजार कोटी रुपये उकळले, त्यांचा हिशोब राऊतांनी द्यावा, मग चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचार. चंद्रकांत पाटील हे जनतेतून निवडून आले आहेत, राऊतांसारखे मागच्या दाराने सभागृहात गेलेले नाहीत.
हा इतिहास शिवसैनिक कधीही विसरणार नाही
नवनाथ बन म्हणाले की, कोण कुणाचे अंगवस्त्र आहे, यावर बोलण्यापूर्वी संजय राऊत यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वापुढे उबाठा गटाने पत्करलेल्या शरणागतीचे आत्मपरीक्षण करावे, असा टोला बन यांनी लगावला आहे. तर उबाठा गटाची एवढी दयनीय अवस्था संजय राऊत यांनी केली की, आज पक्षाचे स्वतंत्र अस्तित्वच प्रश्नांकित झाले आहे; हा इतिहास शिवसैनिक कधीही विसरणार नाही. राहुल गांधींचे लांगूलचालन आणि सोनिया गांधींची गुलामी, हेच उबाठा गटाचे राजकीय धोरण बनले आहे; त्यामुळे दुसऱ्यांवर बोलण्याचा नैतिक अधिकार संजय राऊत यांनी गमावला आहे. उरलेला उबाठा गट राहुल गांधींच्या चरणी अर्पण करून पक्ष काँग्रेसच्या स्वाधीन कधी करणार, याचे उत्तर संजय राऊत यांनी महाराष्ट्राला द्यावे. सोनिया गांधी सांगतील ते धोरण आणि राहुल गांधी ठरवतील ते तोरण, अशी उबाठा गटाची अवस्था झाली आहे; मग काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा मुहूर्त कधी? असा सवाल बन यांनी केला आहे.
राष्ट्रवादीचे नेतृत्व करण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम
नवनाथ बन म्हणाले की, सुनेत्राताई पवार यांच्या राजकीय निर्णयाची चिंता करण्यापेक्षा उबाठा गटाचा झालेला बचत गट कसा टिकवायचा, याचा विचार संजय राऊत यांनी करायला हवा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत; विलीनीकरणाबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्यांचाच आहे. हे ही वृत्त वाचा गोकुळची सत्ता अमूलच्या घशात घालायची आहे, संजय राऊतांचा गंभीर आरोप:निवडणुकीवरून फडणवीस, अमित शहा, हसन मुश्रीफ अन् चंद्रकांत पाटलांवर निशाणा

‘गोकुळ’ दूध संघाच्या अध्यक्ष निवडीत महायुतीने सत्ता मिळवल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद राज्यभर उमटू लागले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी कोल्हापूरमधील या घडामोडींवर अत्यंत आक्रमक आणि शेलक्या शब्दांत टीका केली आहे. हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील यांच्या भूमिकेवरही त्यांनी आक्षेप घेतला. तसेच, अमित शहांना गोकुळ अमूलच्या घशात घालायचे असल्याचा गंभीर आरोपही राऊत यांनी केला. वाचा सविस्तर