Headlines

आरटीओच्या 14 सेवा फेसलेस होणार:20 नोव्हेंबरपासून परवाना आणि वाहन नोंदणीची कामे ऑनलाइन; अर्ज, शुल्क भरणे अन् प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया घरबसल्या




वाहन परवाना आणि नोंदणीच्या कामांसाठी आरटीओ कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होणार आहे. मोटार वाहन विभागाने या कामांशी संबंधित आणखी 14 सेवा फेसलेस करण्याचा निर्णय घेतला आहे. ही व्यवस्था 20 नोव्हेंबरपासून लागू होईल. अर्जदारांना घरबसल्या अर्ज करणे, शुल्क भरणे आणि प्रमाणपत्र मिळवणे शक्य होईल. मात्र, काही सेवांसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जाणे आवश्यक राहील.फेसलेस प्रक्रियेत आधार प्रमाणीकरणाद्वारे अर्जदाराची ओळख निश्चित केली जाते. ई-केवायसीने माहितीची पडताळणी, कागदपत्रांचे डिजिटल अपलोड, ऑनलाइन शुल्क भरणे आणि ई-साइनद्वारे अर्ज पूर्ण केला जातो. अर्जातील माहितीची सारथी (परवाना) आणि वाहन (नोंदणी) या राष्ट्रीय संगणकीय प्रणालींमधील नोंदींशी पडताळणी केली जाते. त्यानंतर संबंधित अधिकारी डिजिटल मंजुरी देतात. त्यामुळे कागदपत्रांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी कार्यालयात जाण्याची गरज कमी होते.परिवहन सेवांमध्ये आधार प्रमाणीकरण, ई-केवायसी, ई-साइन किंवा डिजिटल स्वाक्षरी, एआयवर आधारित चेहरा ओळख आणि गरजेनुसार जीपीएस लोकेशन नोंदवण्याचे तंत्रज्ञान वापरले जात आहे.शिकाऊ परवान्याच्या ऑनलाइन परीक्षेत चेहरा ओळखून परीक्षार्थीची ओळख निश्चित केली जाते. दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीने परीक्षा देण्यासारखे गैरप्रकार रोखण्याचा यामागे प्रयत्न आहे. केंद्राच्या 7 जुलै 2026 च्या अधिसूचनेनुसार, ऑनलाइन सेवांसाठी आधार प्रमाणीकरण ऐच्छिक आहे. आधार नसलेले नागरिक पर्यायी ओळखपत्रांसह संबंधित कार्यालयात प्रत्यक्ष अर्ज करू शकतात.आधारवरील नाव किंवा जन्मतारीख आणि आरटीओच्या नोंदींमध्ये तफावत असल्यास ऑनलाइन अर्ज अडकू शकतो. अशा वेळी कागदपत्रांची पडताळणी करून दुरुस्ती करावी लागेल.वाहनाची प्रत्यक्ष तपासणी, फिटनेस किंवा वाहन चालवण्याची चाचणी आवश्यक असलेल्या सेवांसाठी नियमांनुसार कार्यालयात जावे लागेल. आधारचा ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती एजंटला देणे टाळावे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *