![]()
अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देऊन तृतीय व चतुर्थ श्रेणीप्रमाणे वेतन व भत्ते लागू करावेत, यासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने मंगळवारी (दि. १७) नाशिक जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात जिल्हाभरातील अंगणवाडी कर्मचारी काळ्या साड्या परिधान करून सहभागी होणार आहेत. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत सुमारे १ लाख १०,६६४ अंगणवाडी केंद्रांमध्ये जवळपास दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. दररोज आठ ते दहा तास काम करूनही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते देण्यात यावेत, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅच्युइटी लागू करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. इत्यादी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १७ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
Source link
अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे उद्या विविध मागण्यांसाठी धरणे:शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्याची प्रमुख मागणी