![]()
शिवसेनाप्रमुख, हिंदुहृदयसम्राट दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज शिवतीर्थावर जाऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना विनम्र अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी बाळासाहेबांचे विचार, त्यांची शिकवण आणि सध्या राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर शिवसेनेची आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार या महाराष्ट्रात काम करत असून, राज्यात सध्या दुष्काळाचे मोठे संकट असले तरी शिवसेना कुठेही कमी पडणार नाही आणि शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही,” अशी ग्वाही शिंदेंनी दिली. ‘बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार राज्यात काम करतंय’ उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो. बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्वाचा वसा पुढे नेण्याचे काम शिवसेना ताकतीने करत आहे. ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हा त्यांनी दिलेला मूलमंत्र सर्व शिवसैनिक जपत आहेत. त्यांनी घडवलेली युती अभेद्य ठेवण्याचे काम शिवसैनिक करत आहेत.” ‘जिथं आपत्ती, तिथं शिवसेना’ राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना शिंदे म्हणाले, “सध्या महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटात आहे आणि आमचा शेतकरी अडचणीत आहे. बाळासाहेबांची शिकवण हीच होती की, कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. त्यानुसार आमचे शिवसैनिक आणि कार्यकर्ते शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या संवेदना आणि दुःख ऐकून त्यांना मदत करत आहेत. जिथं संकट, जिथं आपत्ती, तिथं शिवसेना ही बाळासाहेबांची आणि आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढे नेण्याचे काम सुरू आहे.” सर्व लोकप्रतिनिधींना बांधावर जाण्याचे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांनाही एक महत्त्वाचे आवाहन केले. ज्या ज्या ठिकाणी दुष्काळ आहे, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्या. सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ दिली नाही, तातडीची दहा हजार रुपयांची मदत केली आणि शिवसेनेनेही दिवाळीचा शिधा दिला. यापुढेही जे जे आवश्यक असेल, ते सर्व शिवसेना करेल,” असे ते म्हणाले. विरोधकांना सडेतोड उत्तर ‘सरकारची मदत तुटपुंजी आहे,’ या विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री म्हणाले, मदत तुटपुंजी नाही, तर ही पाच हजारांची ‘अतितात्काळ अग्रिम मदत’ आहे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या हातात तातडीने काहीतरी पैसे असावेत. शेतकऱ्यांच्या मागणीनुसारच आम्ही दुष्काळ जाहीर केला असून, त्याअंतर्गत मिळणाऱ्या १२ सवलती आणि नुकसानभरपाई तर मिळणारच आहे. पण सध्या विरोधक विनाकारण याचा बाऊ करत आहेत. ही वेळ राजकारण करण्याची नाही, तर संकट मोठे असल्याने सर्वांनी हजारो-लाखो हात पुढे करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची आहे.” —————– हेही वाचा.. अजितदादांच्या मृत्यूच्या संशयावरून FIR का दाखल नाही?: संजय राऊतांचा फडणवीस-शहांवर हल्लाबोल, मफलर मॅनचे कोडे रोहित पवारांनी सोडवल्याचा दावा
दिवंगत नेते अजित पवार यांच्या पुतळ्याचे पुण्यात अनावरण झाल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत अजितदादांच्या रहस्यमय मृत्यूच्या तपासावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत खळबळजनक आरोप केले आहेत. अजितदादांच्या मृत्यूच्या संशयास्पद हत्येचा तपास का दाबला जात आहे? एफआयआर का दाखल केला नाही? मुख्यमंत्री त्यातील पात्रांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. सविस्तर वाचा
Source link