Headlines

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर:सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याची मागणी, निवृत्त कर्मचारीही एक दिवसाचे उपोषण करणार




सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी आजपासून बेमुदत कामबंद संप सुरू केला आहे. राज्यातील सुमारे ३४ हजार कर्मचारी या आंदोलनात सहभागी असल्याची माहिती कर्मचारी संघटनांनी दिली. मुंबई उच्च न्यायालयाने जिल्हा आणि दुय्यम न्यायालयांतील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी लागू करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. हा प्रस्ताव सुमारे २२ महिन्यांपासून प्रलंबित असून, त्यावर ठोस निर्णय झालेला नसल्याचा कर्मचाऱ्यांचा आरोप आहे. महाराष्ट्र राज्य न्यायालयीन कर्मचारी महासंघाने या मागणीसाठी वेळोवेळी पाठपुरावा केला आणि टप्प्याटप्प्याने आंदोलने केली. मागणी मान्य न झाल्याने बेमुदत कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्याचे संघटनांनी सांगितले. विविध संवर्गांतील कर्मचारीही संपात सहभागी पुणे जिल्हा न्यायालय आणि अधीनस्थ न्यायालयांतील विविध संवर्गांतील कर्मचारीही संपात सहभागी आहेत. यात प्रबंधक, अधीक्षक, सहायक अधीक्षक, नाजर, लघुलेखक, लिपिक, बेलिफ, वाहनचालक, कोर्ट कीपर, शिपाई आणि सफाईगार यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांना लागू असलेल्या सुधारित वेतनश्रेणीप्रमाणे जिल्हा न्यायालयातील कर्मचाऱ्यांनाही वेतनश्रेणी लागू करावी, अशी संघटनांची मागणी आहे. यासाठी शासन आणि संबंधित कार्यालयांकडे सातत्याने पाठपुरावा केल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवृत्त न्यायालयीन कर्मचारी एक दिवसाचे अन्नत्याग, साखळी उपोषण करणार आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील सुमारे पाच हजार निवृत्त न्यायालयीन कर्मचारी एक दिवसाचे अन्नत्याग आणि साखळी उपोषण करणार आहेत. सेवेत असलेले आणि निवृत्त कर्मचारी या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधणार आहेत. संपामुळे न्यायालयीन कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. पक्षकार आणि नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी आंदोलनाची पूर्वसूचना दिल्याचे संघटनांनी सांगितले. प्रलंबित प्रस्तावावर लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. हेही वाचा.. अजित पवारांच्या पुतळ्यासमोर शहांनी माफी मागायला हवी होती:उद्धव ठाकरेंचा घणाघात; म्हणाले- 70 हजार कोटींचा आरोप करून जगणं मुश्किल केलं होतं, आता थोरवी गातायत

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांनी विनम्र अभिवादन केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवारांच्या पुतळ्यासमोर अमित शाह यांनी माफी मागायला हवी होती, असे उद्धव ठाकरे म्हणाले. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *