![]()
दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेतील मुख्य प्रतोद आमदार प्रसाद लाड यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पत्र लिहून पक्षाची अधिकृत भूमिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. “मौन हे अनेकदा संभ्रम निर्माण करते. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेले आरोप आपल्या पक्षाला मान्य नसतील, तर त्याचे स्पष्ट खंडन करावे; अन्यथा रोहित पवारांच्या भूमिकेला पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहीर करावे,” असे थेट आव्हान लाड यांनी या पत्रातून दिले आहे. या पत्राची प्रत पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनाही पाठवण्यात आली आहे. नेमके प्रकरण काय आणि प्रसाद लाड पत्रात काय म्हणाले? आमदार रोहित पवार यांनी सोमवार, 16 नोव्हेंबर 2026 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत तथाकथित ‘मफलर मॅन’ संदर्भातील छायाचित्रे दाखवत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संशय व्यक्त करणारी विधाने केली होती. यावर तीव्र आक्षेप घेत आमदार प्रसाद लाड यांनी मंगळवार, 17 नोव्हेंबर 2026 रोजी शरद पवार यांना सविस्तर पत्र लिहिले आहे. कोणत्याही दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे; मात्र कोणतीही सत्यता सिद्ध होण्यापूर्वीच राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या स्वच्छ प्रतिमेला डाग लावण्याचा आणि त्यांना संशयाच्या भोवऱ्यात उभे करण्याचा प्रकार कितपत योग्य आहे, असा सवाल लाड यांनी उपस्थित केला आहे. प्रसाद लाड यांनी शरद पवारांना विचारलेले 4 थेट प्रश्न पत्राद्वारे प्रसाद लाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाला खालील 4 महत्त्वाचे प्रश्न विचारून उत्तर मागितले आहे… राजकीय सभ्यतेची आठवण आणि तत्काळ खुलाशाची मागणी राजकारणात मतभेद आणि आरोप-प्रत्यारोप होत असतात, मात्र सार्वजनिक जीवनात व्यक्तींची प्रतिष्ठा, राजकीय सभ्यता आणि जबाबदार वक्तव्ये यांना तितकेच महत्त्व असते, अशी आठवण लाड यांनी करून दिली आहे. या अत्यंत संवेदनशील विषयावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषद, अधिकृत निवेदन, पत्र किंवा समाजमाध्यमांद्वारे मौन सोडून तात्काळ पक्षाची भूमिका स्पष्ट करावी, अशी अपेक्षा प्रसाद लाड यांनी व्यक्त केली आहे. ———————————————————– हेही वाचा… 3 कोटी बेकायदेशीर आणि परदेशी मतदारांना वाचवण्यासाठी काँग्रेसचे अकांडतांडव: आशिष शेलार यांचे राहुल गांधींना 6 थेट सवाल, रोहित पवारांवरही घणाघात मतदार यादीच्या विशेष पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेवरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर भाजप नेते व कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी अत्यंत तीव्र शब्दांत हल्लाबोल केला आहे. “देशातील 3 कोटी लापता, अवैध आणि अभारतीय मतदारांची नावे मतदार यादीत कायम ठेवण्यासाठी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्ष खोट्याचे दुकान मांडून अकांडतांडव करत आहेत,” असा थेट आरोप शेलार यांनी केला. मंगळवारी (17 नोव्हेंबर 2026) मुंबईतील भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसला 6 थेट प्रश्न विचारत आव्हान दिले, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करणाऱ्या रोहित पवारांचाही ‘राजकीय नीचपणा’ अशा शब्दांत समाचार घेतला. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
शरद पवार साहेब, मौन सोडा!:रोहित पवारांच्या फडणवीसांवरील आरोपांचे खंडन करा किंवा पाठिंबा जाहीर करा; प्रसाद लाड यांचे खरमरीत पत्र