Headlines

'मुली मुलांवर नाही, तर पैशांवर प्रेम करतात!':इंदुरीकर महाराजांचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले- 'लव्ह इज मनी अँड मनी इज लव्ह'




महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज पुन्हा एकदा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. एका प्रवचनादरम्यान त्यांनी प्रेम आणि नात्यांवर भाष्य करत म्हटले की, मुली कधीच मुलांवर प्रेम करत नाहीत, तर त्या केवळ पैशांवर प्रेम करतात. त्यांच्या मते, तरुण मुले अनेकदा मुली आपल्यावर प्रेम करतात असा गैरसमज करून घेतात, मात्र हे सत्य नसून मुलींचे प्रेम पैशांशी जोडलेले असते. हे स्पष्ट करताना ते म्हणाले, प्रेम वगैरे सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. यावेळी त्यांनी प्रेमाची स्वतःची अशी एक व्याख्याही सांगितली. त्यांनी आपले मत मांडताना स्पष्ट केले, “लव्ह इज मनी अँड मनी इज लव्ह. मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी.” इंदुरीकर महाराजांच्या या थेट विधानामुळे आता पुन्हा एकदा समाजात आणि सार्वजनिक पातळीवर त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नेमके काय म्हणाले इंदूरीकर महाराज? प्रवचन सुरू असताना इंदूरीकर महाराजांनी म्हटले की, असे म्हणतात की ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. तिच्या मेंदूच्या तीन शिरा चोकअप आहेत. तेवढ्या काढून ये. पोरगी कधीच मुलावर प्रेम करत नाही. पोरगी पैशावर प्रेम करते. मुलगी कधीच प्रेम करत नाही. खरे आहे की खोटे आहे? तुम्हाला तिघांना आलेला अनुभव आहे. असे म्हणत एका तरुणाकडे ते बोट करून म्हणतात, याला तर मागच्याच महिन्यात मुलीने धोका दिला आहे. खोटं बोलणार नाही. तसेच पुढे बोलताना इंदूरीकर महाराजांनी स्वतःची एक प्रेमाची व्याख्या सांगितली आहे. ते म्हणतात की, प्रेम वगैरे या सगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. इंदूरीकरची व्याख्या आहे, ‘लव्ह इज अ मनी अँड मनी इज अ लव्ह. मनी इज लाइफ अँड लाइफ इज मनी.’ आता त्यांनी केलेल्या या विधानाची सध्या जोरदार चर्चा सुरू असून यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. इंदूरीकर महाराजांची यापूर्वीची गाजलेली वादग्रस्त विधाने इंदूरीकर महाराजांनी फेब्रुवारी 2020 मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील शेलद आणि उरण येथील कीर्तनादरम्यान अपत्यप्राप्तीविषयी एक वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी म्हटले होते की, “सम तिथीला स्त्री संग केला तर मुलगा होतो आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते आणि अशुद्ध वेळेला रांगडी संतती जन्माला येते.” यानंतर त्यांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. हे वक्तव्य ‘गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्याचे’ (PCPNDT Act) उल्लंघन करणारे असल्यामुळे, संगमनेर न्यायालयात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना कायदेशीर नोटीस बजावण्यात आली होती. महिलेची तुलना चपलेशी महिलांविषयी असेच आणखी एक वादग्रस्त विधान इंदूरीकर महाराजांनी केले होते. त्यांनी एका प्रवचनात महिलांची तुलना थेट चपलेसोबत केली होती. त्यांनी म्हटले होते की, “लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावाने हाक मारते…ही किती मोठा कमीपणा आहे… आपण पुरुष आहोत पुरुष… नवरा आहे नवरा… बायकोने मला एकेरी हाक मारली तर दात नाही का पाडणार तिचे? चप्पल कितीही भारी झाली म्हणून काय गळ्यात घालतो का? अहो चप्पल कुठे शोभते? बायको आहे ती. तिने त्या मापात असावे.” असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते. ‘तुमचे मुलं दिव्यांग जन्माला येतील’ तसेच आणखी एक वादग्रस्त विधान म्हणजे इंदूरीकर महाराजांनी त्यांचे व्हिडिओ यूट्यूबवर टाकणाऱ्यांना म्हटले होते की, “माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ कलिप्स यूट्यूबवर टाकणाऱ्यांचे मुलं दिव्यांग जन्माला येतील. त्यांचे वाटोळे होईल. माझ्या जिवावर आतापर्यंत 4 हजारपेक्षा जास्त लोकांनी यूट्यूबकडून कोट्यवधी रुपये कमावले आहेत. यात लोकांनी मला अडचणीत आणले आहे,” असे विधान त्यांनी केले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *