Headlines

Rohit Pawar Slams Satyajit Tambe & BJP Leaders; Mumbai Politics Update


दिवंगत नेते अजित पवार यांच्या विमान अपघातावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर भाजप नेते आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सडेतोड प्रत्युत्तर

.

सत्यजीत तांबेंच्या ‘त्या’ पोस्टवर खोचक टोला

सत्यजीत तांबे यांनी फेसबुक पोस्ट लिहून अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांच्या मैत्रीची आठवण करून देत रोहित पवारांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला होता. यावर विचारले असता रोहित पवार यांनी तांबे यांचा ‘कार्यकर्ता’ असा उल्लेख करत खोचक टोला लगावला. “मी काल सत्तेतील नेत्यांना प्रश्न विचारले आहेत, तुम्ही कार्यकर्त्यांची नावे घेत आहात. मी मोठ्या नेत्यांना फॉलो करतो; प्रत्येक जण ट्विट किंवा पोस्ट करत असतो, ते सर्वच मी वाचले पाहिजे किंवा फॉलो केले पाहिजे, असे मला वाटत नाही,” असे म्हणत त्यांनी तांबे यांच्या सल्ल्याला फारसे महत्त्व देण्याचे टाळले.

प्रसाद लाड यांचे पत्र आणि पक्षाच्या भूमिकेवर स्पष्टीकरण

भाजप नेते प्रसाद लाड यांनी शरद पवार यांना पत्र लिहून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली होती, तर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदेची कल्पना नसल्याचे म्हटले होते. यावर बोलताना रोहित पवार म्हणाले की, “कालच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने मला हाच प्रश्न विचारला होता आणि त्याला मी तिथेच सविस्तर उत्तर दिले आहे; तेच उत्तर मी पुन्हा देणार नाही. माझी बांधिलकी विचारांशी, अजितदादांशी आणि महाराष्ट्रातील सामान्य जनतेशी आहे. ज्यांची बांधिलकी केवळ नेत्यांशी आहे, त्यांना उत्तर देण्याची गरज मला वाटत नाही.” तसेच, आज बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचे दर्शन घेण्यासाठी आलो असल्याने इथे कोणतेही राजकीय वक्तव्य करणार नाही, योग्य वेळी योग्य ठिकाणी उत्तर देईन, असे त्यांनी स्पष्ट केले.

एअर इंडिया इमारत दुरुस्ती आणि हिवाळी अधिवेशनावरून सरकारवर टीका

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या आर्थिक नियोजनावर आणि विविध प्रकल्पांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मंत्रालयासमोर असलेली एअर इंडियाची इमारत राज्य सरकारने 1600 कोटी रुपयांना विकत घेतली आणि आता तिच्या दुरुस्तीसाठी तब्बल 400 कोटी रुपये खर्च करणार आहे. एवढ्या 2000 कोटी रुपयांत तर एक नवीन भव्य इमारत उभी राहिली असती. एकीकडे सरकार पैसे नसल्याचे सांगते आणि दुसरीकडे अशी उधळपट्टी करते. त्याऐवजी दुष्काळात शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी आणि कष्टकऱ्यांना मदत करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

हिवाळी अधिवेशन विदर्भातच व्हावे

राज्यात, विशेषतः विदर्भ आणि मराठवाड्यात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. विदर्भातील जनतेचे प्रश्न मांडता यावेत आणि त्यांना न्याय मिळावा यासाठी आगामी हिवाळी अधिवेशन मुंबईऐवजी नागपूरमध्येच घेतले पाहिजे, अशी आग्रही मागणी त्यांनी केली.

स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प करावेत

पाटण तालुक्यातील पंप स्टोरेज प्रकल्पात वन विभागाची परवानगी न घेता वृक्षतोड झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना, कोणताही विकास प्रकल्प राबवण्यापूर्वी स्थानिक नागरिक आणि ग्रामपंचायतींना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक असते, अन्यथा जनतेचा उद्रेक होतो, असे मत त्यांनी मांडले.

बाळासाहेबांच्या विचारांची प्रेरणा घेऊन संघर्ष करत राहू

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 14 व्या स्मृतिदिनानिमित्त सलील देशमुख आणि कार्यकर्त्यांसह रोहित पवार यांनी स्मृतिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केले. मराठी माणसाचा स्वाभिमान जपण्यासाठी बाळासाहेबांनी पक्ष काढला आणि आयुष्यभर संघर्ष केला. त्यांच्या या संघर्षातून आम्ही कालही प्रेरणा घेतली होती, आजही घेत आहोत आणि भविष्यातही हीच प्रेरणा घेऊन जनतेसाठी संघर्ष करत राहू, अशा भावना रोहित पवार यांनी व्यक्त केल्या.

——————————————————

हेही वाचा…

रोहितजी, थोडं सबुरीने घ्या!: महत्त्वाकांक्षांसाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात; सत्यजीत तांबेंनी रोहित पवारांचे टोचले कान

दिवंगत नेते अजित पवार यांच्या बारामतीमधील विमान अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांनंतर राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. या विमान अपघाताला जबाबदार असलेल्या कंपनीला वाचवण्यामागे ‘मफलर मॅन’ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका असल्याचा खळबळजनक आरोप रोहित पवारांनी सोमवारच्या पत्रकार परिषदेत केला होता. यावरून भाजप नेत्यांनी रोहित पवारांवर चौफेर टीका सुरू केली असतानाच, आता एकाच पिढीतील तरुण नेतृत्व मानले जाणारे विधान परिषदेचे आमदार सत्यजीत तांबे यांनीही समाजमाध्यमावर सविस्तर पोस्ट लिहून रोहित पवार यांचे कान टोचले आहेत. “प्रत्येकाला राजकीय महत्त्वाकांक्षा असतात, पण त्यासाठी मर्यादा ओलांडायच्या नसतात. थोडं सबुरीने घ्या,” असा मित्रत्वाचा आणि रोखठोक सल्ला तांबे यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.