Headlines

23 वर्षांनंतर जुन्या मित्रांची भरली शाळा:ताहाराबाद न्यू इंग्लिश स्कूलच्या 2003-2004 च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा




ताहाराबाद येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या २००३-२००४ या शैक्षणिक वर्षातील माजी विद्यार्थी-विद्यार्थ िनींचा स्नेहमेळावा मोठ्या उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला. तब्बल २३ वर्षांनंतर एकाच वर्गात शिकलेले मित्र-मैत्रिणी पुन्हा एकत्र आल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एन. साळवे होते. यावेळी बी.डी. नंदन, पाटील, बी.एस. देवरे आणि जी. एल. आहेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला. तब्बल २३ वर्षांनंतर भेटलेल्या मित्र-मैत्रिणींनी शाळेतील गमतीजमती, वर्गातील आठवणी, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि जुन्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. अनेकांनी आपल्या भावना व्यक्त करत शालेय जीवनातील तो काळ पुन्हा अनुभवला. या स्नेहमेळाव्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह ओसंडून वाहत होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप निकम, गणेश नंदन आणि स्वप्नील महाजन यांनी केले. तर आभार प्रदर्शन स्वप्नील महाजन यांनी केले. माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेला शालेय उपयोगासाठी कचरा संकलन साहित्य भेट देण्यात आले. शाळेप्रती असलेली कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी या उपक्रमातून व्यक्त करण्यात आली. स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *