Headlines

धाराशिवच्या शेतकऱ्यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा:रखडलेला 227 कोटींचा पीक विमा वाटप करण्याचे आदेश, खरीप 2020 हंगामातील विम्याचा प्रश्न मार्गी




धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक आणि ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून, खरीप 2020 हंगामातील रखडलेला 227 कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार असून, प्रत्येक शेतकऱ्याला साधारणतः 9 हजार रुपयांची मदत मिळणार आहे. विशेष म्हणजे या रकमेचे वितरण येत्या आठ ते दहा दिवसांत सुरू होणार आहे. या संदर्भात माहिती देताना आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले की, आज सर्वोच्च न्यायालयात धाराशिव जिल्ह्याच्या पीक विम्याच्या संदर्भात चालू असलेल्या केसच्या संदर्भात माननीय डक साहेब व सर्वोच्च न्यायालयाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. धाराशिव जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांची पीक विम्याची केस मी लढत होतो, त्यात 227 कोटी पीक विमा शेतकऱ्यांना देण्याचा या न्यायालयाने निर्णय दिला. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याला साधारणतः 9 हजार रुपये या निर्णयानंतर मिळणार आहेत. त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आणि डक साहेबांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. शेतकऱ्यांना 227 कोटी रुपये वाटप करण्याचे आदेश अनिल जगताप यांनी म्हटले की, आज धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक दिवस ठरलेला आहे. माननीय ज्ञानराज चौगुले साहेबांनी सर्वोच्च न्यायालयात खरीप 2020 साठी इंटरव्हेंशन पिटीशन दाखल केलेलं होतं. आपले वकील साहेब आदरणीय अतुल डक साहेबांनी अतिशय जोरदार असा युक्तिवाद केला आणि सर्वोच्च न्यायालयाने धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 227 कोटी रुपये वाटप करण्याचे आदेश दिलेले आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे हे पैसे जमा आहेत, त्यामुळे या पैशांचे वितरण देखील येत्या आठ ते दहा दिवसांमध्ये होणार आहे. 9,48,990 अर्जदार शेतकऱ्यांपैकी 3,57,282 सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. माननीय ज्ञानराज चौगुले साहेबांनी याच्यासाठी जे कष्ट घेतले ते या धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी कधीही विसरणार नाहीत, हे देखील या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो, अशी माहिती जगताप यांनी दिली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *