![]()
लग्नाचे आश्वासन देऊन महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याचा आणि अन्य दोन महिलांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या मोहम्मद माझीन याला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी दुबईतून अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकेच्या भीतीने त्याने थेट परदेशात पलायन केले होते. मात्र, पोलिसांनी तांत्रिक तपास आणि कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून त्याचा माग काढत दुबईतून ताब्यात घेतले. त्यानंतर विमानाने केरळमार्गे त्याला छत्रपती संभाजीनगरात आणण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या इतिहासात परदेशातून आरोपीला अटक करून आणण्याची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. लग्नाचे आश्वासन देऊन महिलेची फसवणूक मोहम्मद माझीन याच्याविरोधात सुमारे वर्षभरापूर्वी छत्रपती संभाजीनगरमधील सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्याने एका महिलेशी जवळीक निर्माण करून तिच्याशी लग्न करण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या आश्वासनाच्या आधारे त्याने संबंधित महिलेचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. महिलेचा विश्वास संपादन करून लग्नाचे आश्वासन दिले, मात्र प्रत्यक्षात त्याने लग्न केले नाही. त्यामुळे संबंधित महिलेने पोलिसांत धाव घेतली होती. अन्य दोन महिलांनाही आर्थिक गंडा केवळ एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याचाच नव्हे, तर अन्य दोन महिलांची आर्थिक फसवणूक केल्याचाही आरोप मोहम्मद माझीन याच्यावर आहे. या तिन्ही महिलांकडून त्याने वेगवेगळ्या कारणांनी पैसे घेतल्याची माहिती समोर आली होती. तक्रारीनुसार, आरोपीने एकूण 19 लाख 73 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला होता. मात्र, अटकेची शक्यता लक्षात येताच आरोपीने शहरातून पलायन केले आणि दुबई गाठली. दुबईत लपला, पोलिसांनी शोधून काढले गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी परदेशात पळून गेल्याने तपासासमोर मोठे आव्हान निर्माण झाले होते. मात्र, आरोपी परदेशात असल्यामुळे पोलिसांनी त्याचा शोध घेणे थांबवले नाही. त्याच्या हालचालींची माहिती मिळवण्यासाठी तांत्रिक तपास करण्यात आला. त्याचबरोबर आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून दुबईपर्यंत त्याचा माग काढण्यात आला. अखेर पोलिसांना आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले. दुबईतून केरळमार्गे संभाजीनगरात आणले दुबईतून ताब्यात घेतल्यानंतर मोहम्मद माझीन याला विमानाने प्रथम केरळ येथे आणण्यात आले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याला कडक बंदोबस्तात छत्रपती संभाजीनगर येथे आणले. परदेशातून आरोपीला अटक करून शहरात आणण्याची छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांची ही पहिलीच कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईमुळे गंभीर गुन्हे करून परदेशात आश्रय घेणाऱ्या आरोपींचाही शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते, हे पोलिसांनी दाखवून दिले आहे. आता आरोपीच्या अटकेनंतर या प्रकरणातील आर्थिक व्यवहार, महिलांची फसवणूक करण्याची पद्धत आणि इतर संभाव्य बाबींच्या तपासाला महत्त्व येणार आहे. ————————————————————- हेही वाचा… डिलिमिटेशनला विरोध नाही, पण दक्षिणेतील राज्यांवर अन्याय नको; आघाडीत राहून मोदींना फायदेशीर ठरेल अशी दुटप्पी भूमिका घेऊ नये; पृथ्वीराज चव्हाण यांचा मविआला घरचा आहेर आगामी काळात पुन्हा एकदा मतदारसंघ पुनर्रचनेची (डिलिमिटेशन) चर्चा सुरू होत असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या मुद्द्यावर अत्यंत परखड भूमिका मांडली आहे. “डिलिमिटेशन व्हायला आमची कोणतीही हरकत नाही, मात्र यामुळे दक्षिणेतील राज्यांवर अन्याय होऊ नये; त्यासाठी जनगणनेची नेमकी कोणती तारीख ग्राह्य धरली जाणार हे महत्त्वाचे आहे,” असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच, डिलिमिटेशनच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून घेतल्या जाणाऱ्या भूमिकेवर भाष्य करताना, “एकीकडे इंडिया आघाडीत राहायचे आणि दुसरीकडे मोदी सरकारला सोयीची ठरेल अशी भूमिका घ्यायची, असा दुटप्पीपणा किंवा तळ्यात-मळ्यात करू नये,” असा सूचक टोलाही त्यांनी लगावला. ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शिवचरित्रावरील पुस्तकाच्या इंग्रजी अनुवाद प्रकाशन सोहळ्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
लग्नाचे आमिष दाखवून महिलेचे लैंगिक शोषण, 19.73 लाखांची फसवणूक:आरोपीला दुबईतून अटक करून संभाजीनगरात आणले