![]()
सटाणा शहरातून जाणाऱ्या विंचूर-प्रकाशा महामार्गाचे रखडलेले काम येत्या आठ दिवसांत पूर्ण करावे अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी दिला आहे. यासंदर्भात त्यांनी तहसीलदार आणि पोलिस निरीक्षक योगेश पाटील यांना निवेदन दिले. विंचूर-प्रकाशा महामार्गाचे काम रखडल्याने सटाणा शहरासह संपूर्ण बागलाण तालुक्यातील नागरिक त्रस्त झाले आहेत. रस्त्यावरील मोठमोठे खड्डे, उडणारी धूळ आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी यामुळे वाहनचालक, व्यापारी तसेच पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावरून प्रवास करताना अपघातांचा धोकाही वाढला आहे. निर्धारित मुदतीत काम पूर्ण न झाल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सोनवणे यांनी दिला. यावेळी ज्येष्ठ नेते अरविंद सोनवणे, शहरप्रमुख सुनील पाटील, तालुका संघटक विशाल आंबेकर, महिला आघाडी शहरप्रमुख कल्पना सोनवणे, नितीन सोनवणे आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
विंचूर-प्रकाशा महामार्गाचे काम 8 दिवसांत करा:जयप्रकाश सोनवणेंचीनिवेदनाद्वारे मागणी