![]()
निवडणुकीतील विजयावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक ऑडिओ क्लिप प्रसिद्ध करत भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केले आहेत. निवडणुक जिंकण्यासाठी मारण्यासाठी भाजपने जाणीवपूर्वक विरोधी विचारांच्या मतदारांची नावे यादीतून वगळली, असा खळबळजनक दावा त्यांनी केला आहे. ऑडिओ क्लिपमध्ये नेमका काय संवाद आहे? रोहित पवार यांनी शेअर केलेल्या या क्लिपमध्ये मतदार यादीतून नावे कमी करण्यासंदर्भात संभाषण सुरू असल्याचे ऐकायला मिळते. यामध्ये एका व्यक्तीवर भाजप कार्यालयातून पाठवण्यात आलेल्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा संदर्भ येतो. हाच धागा पकडत रोहित पवारांनी भाजपने निवडणुकीत गैरप्रकार केल्याचा आरोप लावला आहे. दरम्यान, या ऑडिओ क्लिपच्या सत्यतेची कोणतीही अधिकृत पुष्टी दिव्य मराठी करत नाही. ‘सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही’ ही ऑडिओ क्लिप पोस्ट करताना रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले की, “निवडणूक जिंकण्यासाठी विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची मतदार यादीतून नावं भाजपाने कशी वगळली आणि रडीचा डाव खेळून सत्ता कशी मिळवली त्याचा घ्या हा पुरावा… या ऑडिओतून शंभर टक्के खात्री झाली की या सरकारला मतदारांनी निवडून दिलं नाही तर यांनी मतांची चोरी करुन सत्तेचा इमला बांधला. त्यामुळं एक क्षणही या सरकारला सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही..!” रोहित पवारांच्या या नव्या आरोपांमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, यावर भाजपकडून नेमके काय प्रत्युत्तर दिले जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ————– हेही वाचा.. अजित पवारांचा 14 महिन्यांत 85 वेळा VSR विमानाने प्रवास: अपघातापूर्वीच्या 8 डिसें. 2024 ते 28 जाने. 2026 कालावधीतील डेटा उघड
अजित पवार यांच्या बारामती विमानळावरील अपघाती मृत्यूस जबाबदार आरोपी म्हणजे व्हीएसआर विमान कंपनीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाचवत आहेत, अशा शब्दात फडणवीसांना टार्गेट करणारा आरोप रोहित पवार यांनी सोमवारी केला होता. या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचा डेटा समोर आला आहे. त्यानुसार ८ डिसेंबर २०२४ ते २८ जानेवारी २०२६ या १४ महिन्यांच्या कालावधीत अजित पवारांनी एकूण १०४ वेळा चार्टर विमानाने प्रवास केला, त्यापैकी ८५ प्रवास (सुमारे ८२ टक्के) त्यांनी ‘व्हीएसआर’ कंपनीच्या तर १९ प्रवास इतर कंपन्यांच्या विमानातून केला. ‘व्हीएसआर’च्या विमानातून प्रवासालाच त्यांची पसंती होती. अशी माहिती समोर आली आहे. केवळ अजित पवारच नव्हे तर शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांनीही व्हीएसआर कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचेही आता स्पष्ट होत आहे. सविस्तर वाचा
Source link
विरोधी विचारांच्या खऱ्या मतदारांची नावं भाजपने वगळली:रोहित पवारांचा रडीचा डाव खेळून सत्ता मिळवल्याचा आरोप; ऑडिओ क्लिप पोस्ट करत पुरावा दिल्याचा दावा