दादर येथील स्थानकाला विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण भूमीचे म्हणजेच ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाचे ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी जोरदार स्वागत केले आहे. मात्र, या नामांतराला व
.
बाळ ठाकरे आणि शरद पवारांप्रमाणेच दोन्ही ठाकरे बंधूंचे राजकारणही विझून जाईल
या पत्रकार परिषदेत गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे आणि ठाकरे गटाच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. ज्याप्रमाणे बाळ ठाकरे आणि वयोवृद्ध नेते शरद पवार यांनी यापूर्वी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराला विरोध करून राजकारण केले होते, त्याच पावलावर पाऊल ठेवून आज राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ‘चैत्यभूमी’ नावाला विरोध करत आहेत. त्यावेळी नामांतराचे शेवटचे वीर सैनिक गौतम वाघमारे यांच्या शहादतीनंतर शरद पवारांना माघार घ्यावी लागली होती. आता या दोन्ही ठाकरे बंधूंचेही राजकारण विझून जाईल आणि त्यांचा दिवा सुद्धा उरणार नाही.
लोकमान्य टिळक आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा दाखला
ज्यावेळी कुर्ला स्थानकाला ‘लोकमान्य टिळक टर्मिनस’ (एलटीटी) हे नाव देण्यात आले, तेव्हा तिथे अनुसूचित जाती-जमातीचे 59 टक्के बहुसंख्य लोक असूनही कोणीही टिळकांची जात पाहून विरोध केला नाही. व्हिक्टोरिया टर्मिनसला ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ नाव देतानाही कोणी विरोध केला नाही. मग ‘चैत्यभूमी’ नावालाच विरोध का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
संदीप देशपांडे आणि बाळा नांदगावकरांना आवाहन
मनसेतील संदीप देशपांडे आणि माजी आमदार बाळा नांदगावकर हे विद्वान नेते आहेत. त्यांनी पक्षात खलबते करून या नामकरणाला विरोध करणाऱ्या आपल्या पक्षातील छुटपुट नेत्यांना लगाम घालावा. तसेच, उद्धव ठाकरेंच्या ज्या आमदाराने संविधानाची शपथ घेतली आहे, त्याने गुळमुळीत बोलणे थांबवावे; या मुद्द्यावर सुषमा अंधारे कुठे हरवल्या आहेत, त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
प्रबोधनकारांच्या विचारांवर चालण्याचा सल्ला
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघेही भाऊ आज राजकारणात निराधार झाले आहेत. त्यांनी बाळ ठाकरेंच्या विचारांऐवजी प्रबोधनकार ठाकरे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालल्यासच त्यांचा राजकीय उद्धार होईल. 5 पिढ्यांपूर्वी ते जिथे होते तिथे जाऊन त्यांनी डोक्यातला अंधार दूर करावा, असा टोलाही त्यांनी लगावला.
कोल्ह्याला द्राक्षे आंबट म्हणून रोहित पवार बोंबलत सुटलेत; जातीयवादी राजकारणावरून प्रहार
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांच्यावर केलेल्या खालच्या पातळीच्या टीकेचाही गुणरत्न सदावर्ते यांनी तीव्र निषेध केला. “नवनाथ बन हे बिगर-मराठा, भटक्या-गोसावी समाजातून येतात म्हणून त्यांना लोकशाहीत बोलण्याचा अधिकार नाही का? रोहित पवारांची ही भाषा त्यांच्या छोट्या मेंदूतील जातीयवादी मानसिकता दाखवते,” अशी टीका सदावर्ते यांनी केली.
पुढे बोलताना सदावर्ते यांनी इसापनीतीतील ‘कोल्ह्याला द्राक्षे आंबट’ (फॉक्स अँड द ग्रेप्स) या गोष्टीचा दाखला देत रोहित पवारांची खिल्ली उडवली. “स्वतःच्या पक्षात सुप्रिया सुळे महत्त्वाकांक्षी आहेत, तर दुसरीकडे अजित पवारांची दोन्ही मुले आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कर्तृत्ववान आहेत. त्यामुळे रोहित पवारांना राजकारणात स्वतःसाठी कुठेही जागा उरलेली नाही. खाण्यास काहीच मिळत नसल्याने कोल्ह्याला द्राक्षे आंबट वाटतात, तशी अवस्था रोहित पवारांची झाली आहे. त्यांनी हे खालच्या पातळीवरचे राजकारण थांबवले नाही, तर त्यांना संविधानाच्या मार्गाने कायदेशीर ‘भीम टोले’ दिले जातील,” असा इशारा सदावर्ते यांनी दिला.
6 डिसेंबरपूर्वीच अनुयायांना मोठा दिलासा; इंदू मिल स्मारकासाठी निधीची कमतरता नाही
येत्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी राज्य सरकार कल्याणकारी निर्णय घेत असल्याचे सदावर्ते यांनी सांगितले. दादरमधील इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकासाठी निधीची कोणतीही कमतरता नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे, तसेच 6 डिसेंबरला येणाऱ्या वाहनांना टोल सवलत देण्याचा विचारही उपमुख्यमंत्र्यांनी पुढे आणला आहे. दरम्यान, दादर रेल्वे स्थानकाऐवजी ‘दादर मेट्रो स्थानकाचे’ नाव बदलून ‘चैत्यभूमी’ केले जाणार असल्याच्या स्पष्टीकरणावर बोलताना, जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चैत्य आहे, त्या प्रत्येक वास्तूला त्यांचे नाव देणे हा महाराष्ट्राचा गौरवच असल्याचे सदावर्ते यांनी ठामपणे सांगितले.
—————————————————-
हेही वाचा…
टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्यांनाही महाराष्ट्राच्या मातीत गाडू: टिपू असता तर काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वास तरी घेऊ शकले असते का?; नितेश राणेंचा अमित देशमुखांवर घणाघात

लातूर शहरात आयोजित टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतानच्या मार्गावर चालण्याचे आणि तरुणांना त्यांच्या जीवनावरील पुस्तके वाटण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. देशमुख यांच्या या वक्तव्याचा आणि समाजमाध्यमांवरील पोस्टचा मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. “ज्या टिपू सुलतानने हजारो हिंदूंची कत्तल केली, मंदिरे लुटली आणि आया-बहिणींवर अत्याचार केले, त्याचे उदात्तीकरण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर टिपू सुलतान आज जिवंत असता, तर स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वासही घेऊ शकले असते का? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत गाडले, अगदी तसेच टिपू सुलतानचे समर्थन करणाऱ्यांनाही गाडण्याची ताकद हिंदू समाजात आहे,” असा सणसणीत इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी