Headlines

Navnath Ban Slams Sanjay Raut Over SRA Scam Allegations


झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) 33(11) योजनेतील प्रकल्पांचे मुंबईतील सर्वात मोठे लाभार्थी स्वतः राऊत बंधू असल्याचा गौप्यस्फोट केल्यानंतर खासदार संजय राऊत यांचा चांगलाच तीळपापड झाला असून त्यांनी कायदेशीर नोटीस बजावण्याचा इशारा दिला आहे. या इ

.

पत्राचाळीत मराठी माणसाला बेघर करणाऱ्या राऊतांनी 100 दिवसांच्या जेलचा हिशोब द्यावा

संजय राऊत यांनी एसआरए प्रकल्पांमध्ये 30000 ते 40000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप करत कायदेशीर कारवाईची भाषा केली होती. यावर नवनाथ बन यांनी पुराव्यानिशी पलटवार केला. बोरीवली, मुलुंड, वांद्रे पूर्व आणि भांडुप पश्चिम येथील श्रद्धा प्राईम प्रोजेक्ट, श्रद्धा मंगलस्मृती, श्रद्धा शेल्टर आणि श्रद्धा स्टे स्पेसेस यांसारखे 7 ते 8 प्रकल्प 100 टक्के पूर्ण झाले आहेत. या प्रकल्पांना 33(11) नियमाचा सर्वाधिक फायदा मिळाला आहे. या 8 प्रकल्पांमध्ये 1000 कोटी, 2000 कोटी, 5000 कोटी की 10000 कोटींचा फायदा झाला, हे राऊतांनी कागदोपत्री स्पष्ट करावे.

पत्राचाळ घोटाळ्यावर मौन का?

संजय राऊत स्वतःला ‘कामशास्त्री’ म्हणवतात; पत्राचाळीत मराठी माणसाची घरे लाटून त्यांना बेघर करण्याचेच ‘काम’ त्यांनी केले आणि त्यातून शेकडो कोटींचा घोटाळा केल्याप्रकरणी 100 दिवस तुरुंगाची हवा खाल्ली. आधी त्यांनी पत्राचाळ घोटाळ्यावर पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रासमोर खुलासा करावा.

कोर्टात नाक घासून माफी मागण्याची परंपरा

यापूर्वी दादा भुसे आणि किरीट सोमय्या यांच्यासह किमान 10 प्रकरणांत राऊतांनी नोटिसा पाठवून नंतर न्यायालयात नाक घासून माफी मागितली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयातही त्यांच्याविरोधात अवमान याचिका सुरू आहे. इतरांना पुढे न करता हिंमत असेल तर राऊतांनी स्वतः मैदानात उतरावे, आमच्याकडे सर्व पुरावे आहेत. तसेच, राऊतांविरोधात बोलू लागल्यापासून साताऱ्यातून धमक्यांचे फोन येत असले तरी देवेंद्र फडणवीस यांचा हा कार्यकर्ता अशा धमक्यांना घाबरणार नाही, असे बन यांनी ठणकावले.

दररोज 100 कोटी वसुलीतून जमवलेले 90000 कोटी कुठे गेले? त्यातून शेतकऱ्यांना मदत द्या!

घोटाळ्याचे पैसे वसूल करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावेत, या संजय राऊत यांच्या विधानावर नवनाथ बन यांनी मविआ सरकारच्या काळातील वसुली प्रकरणाची आठवण करून दिली. “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना दररोज 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट देण्यात आले होते. दररोज 100 कोटी या हिशोबाने अडीच वर्षांत सुमारे 90000 कोटी रुपये जमा होतात. त्यातील 25000 ते 30000 कोटी रुपये निवडणुकांमध्ये खर्च झाले असले, तरी अद्याप उद्धव ठाकरे, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्याकडे 30000 ते 40000 कोटी रुपये शिल्लक असतील. त्या रकमेतून त्यांनी मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत द्यावी,” असा सणसणीत टोला बन यांनी लगावला.

तसेच, भाजपने शिवसेनेला सुरुंग लावला नसून महाराष्ट्राच्या जनतेनेच विधानसभा निवडणुकीत उबाठा गटाचा सुरुंग पेटवून त्यांना अस्ताव्यस्त केले आहे. जनतेच्या न्यायालयात खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांची आणि खरी राष्ट्रवादी अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील असल्याचे सिद्ध झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

राज्यसभेच्या तिकिटासाठी राहुल गांधींची सावरकर व नेताजी बोस यांच्याशी तुलना करणे हे लांगुलचालन

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्याचे समर्थन करताना संजय राऊत यांनी त्यांची तुलना स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याशी केली होती. याचा बन यांनी तीव्र निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच म्हटल्याप्रमाणे, राहुल गांधी परदेशात जातात आणि परत येऊन कधी ‘नीट’ (NEET) तर कधी ‘एसआयआर’ (SIR) सारखी आंदोलने उभी करतात. या आंदोलनांसाठी परदेशी फंडिंग जमा करण्याचा हा प्रकार आहे का, अशी शंका येते. मात्र, परदेशात जाऊन भारताची कितीही बदनामी केली तरी देशातील 140 कोटी जनता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

14 व्या क्रमांकावरून 4 थ्या क्रमांकावर झेप

स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘माफीवीर’ म्हणणाऱ्या आणि त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणाऱ्या राहुल गांधींची तुलना सावरकर व नेताजी बोस यांच्याशी करणे म्हणजे केवळ राज्यसभेची उमेदवारी मिळवण्यासाठी राऊतांनी सुरू केलेले लांगुलचालन आहे. मनमोहन सिंग यांच्या यूपीए सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था 13 व्या व 14 व्या क्रमांकावर होती; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात आज भारत जगातील 4 थ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे. 14 व्या क्रमांकावरून 4 थ्या क्रमांकावर येण्याला राऊत ‘रसातळ’ म्हणत असतील, तर त्यांनी ‘सामना’च्या प्रेसमध्ये नवा शब्दकोश छापावा, अशी खोचक टीका बन यांनी केली.

दरम्यान, प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (मुंबई बँक) पुन्हा एकदा भाजप-महायुतीचा झेंडा फडकवेल, असा विश्वास व्यक्त करतानाच दादर मेट्रो स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ करण्याला विरोध करणाऱ्या संजय राऊतांनी मुंबईत राहून कधी चैत्यभूमीचे दर्शन घेतल्याचा 1 तरी फोटो दाखवावा, असे आव्हानही नवनाथ बन यांनी दिले.

—————————————————————

हेही वाचा…

टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणाऱ्यांनाही महाराष्ट्राच्या मातीत गाडू: टिपू असता तर काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वास तरी घेऊ शकले असते का?; नितेश राणेंचा अमित देशमुखांवर घणाघात

लातूर शहरात आयोजित टिपू सुलतान जयंतीच्या कार्यक्रमात काँग्रेसचे माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांनी टिपू सुलतानच्या मार्गावर चालण्याचे आणि तरुणांना त्यांच्या जीवनावरील पुस्तके वाटण्याचे आवाहन केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. देशमुख यांच्या या वक्तव्याचा आणि समाजमाध्यमांवरील पोस्टचा मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत तिखट शब्दांत समाचार घेतला आहे. “ज्या टिपू सुलतानने हजारो हिंदूंची कत्तल केली, मंदिरे लुटली आणि आया-बहिणींवर अत्याचार केले, त्याचे उदात्तीकरण करणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. जर टिपू सुलतान आज जिवंत असता, तर स्वतःला हिंदू म्हणवून घेणारे काँग्रेसचे नेते हिंदू म्हणून श्वासही घेऊ शकले असते का? ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी औरंगजेबाला महाराष्ट्राच्या भूमीत गाडले, अगदी तसेच टिपू सुलतानचे समर्थन करणाऱ्यांनाही गाडण्याची ताकद हिंदू समाजात आहे,” असा सणसणीत इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.