![]()
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांत छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा पुरस्कार वितरण सोहळ्यात गुरुवारी ता. १९ हिंगोलीच्या दाटेगाव ग्रामपंचायतीला तब्बल एक कोटींचे पारितोषीक देण्यात आले. यावेळी मुखयकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांच्या सादरीकरणातून गाव विकासाचा प्रवास मांडण्यात आला. गावाचा झालेला कायापालट पाहून उपस्थित मंत्री व लोकप्रतिनिधींनी अधिकारी अन गावकऱ्यांचे कौतूक केले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित कार्यक्रमास ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे- बोर्डीकर, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अभियानात प्रथम पुरस्कार मिळविलेल्या हिंगोली तालु्क्यातील दाटेगाव ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा प्रथम पुरस्कार उपस्थितांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुधीर ठोंबरे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड, समृध्दी दिवाणे, विजय बोराटे, गटविकास अधिकारी माया वानखेडे, ग्रामपंचायत अधिकारी उत्तम आडे, सरपंच माने यांच्यासह अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्विकारला. यावेळी गोरे यांनी या अभियानातील पुरस्कारांसाठी ग्रामपंचायतींच्या कामांचे निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यात आले. प्रत्येक गावातील कामांची तीन वेळा तपासणी करण्यात आल्याचे सांगत गाव समृद्ध करण्याचे आवाहन केले. अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अभियान यशस्वी करणाऱ्यांचे त्यांनी कौतूक केले. हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अभियानाच्या अंमलबजावणीचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. यामध्ये अभियानाच्या माध्यमातून गावांनी कसा कायापटल केला याची माहिती दिली. तर दाटेगाव ग्रामपंचायतीची अभियानापुर्वीची परिस्थिती व अभियानाच्या अंमलबजावणीनंतर झालेल्या परिस्थितीतीच माहिती देत गावाने अमुलाग्र बदल केल्याचे सांगितले. नवीन टप्यात जिल्हयातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला असून या सर्व ग्रामपंचायतीमध्ये विकास कामांचे मोठे बदल दिसतील असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी सादरीकरणातून दाटेगाव ग्रामपंचायतीने केलेला प्रवास उलगडून दाखविला. गावपातळीवर झालेले बदल व गाव विकास पाहून उपस्थित मंत्री व लोकप्रतिनिंधींनी अधिकारी व गावकऱ्यांचे कौतूक केले. ——— हेही वाचा.. शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी:कर्जमुक्ती योजनेच्या एकरकमी परतफेडीची कार्यपद्धती जाहीर, 31 मार्च 2027 पर्यंत रक्कम भरण्याची मुदत
राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेत शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकरकमी परतफेड (ओटीएस) योजनेच्या अंमलबजावणीची कार्यपद्धती जाहीर केली आहे. दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकीत कर्ज असलेल्या पात्र शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत संबंधित बँकेत जमा करावी लागणार आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या बँकांच्या शाखा आणि ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार असून, त्यानुसार शेतकऱ्यांना पुढील प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. सविस्तर वाचा
Source link
संभाजीनगरच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात हिंगोलीचा डंका:सीईओंच्या सादरीकरणातून मांडला गावविकासाचा प्रवास, लोकप्रतिनिधींकडून कौतूक