![]()
प्रतिनिधी | संगमनेर शहरातील महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी सीए कैलास सोमाणी यांची, तर व्हा. चेअरमनपदी राजेश लड्डा यांची बिनविरोध निवड सहकार खात्याचे अधिकारी आर.एस.वाकचौरे यांच्या उपस्थितीत पार पडली. मावळते चेअरमन दिनेश सोमाणी, व्हा.चेअरमन संतोष चांडक, अनिल अट्टल,योगेश जाजू,श्रीकांत मणियार,सौ.ज्योती कासट,विशाल नावंदर,अनिल कलंत्री,निलेश बाहेती,योगेश रहातेकर,मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी व व्यवस्थापक दिगंबर आडकी आदी उपस्थित होते. पाचव्या वेळी चेअरमन पदी निवड झालेले चेअरमन सीए सोमाणी यांनी सन २०२५-२६ च्या आर्थिक वर्षात चांगल्या कामगिरीबद्दल गतवर्षीचे चेअरमन सोमाणी, व्हा.चेअरमन चांडक यांचे अभिनंदन केले. संस्थेचे संचालक आनंद तापडे, नानासाहेब शेरमाळे, सरला आसावा व जयप्रकाश भुतडा यांनी नूतन चेअरमन सीए सोमाणी, व्हा. चेअरमन लढ्ढा यांचे अभिनंदन केले.
Source link
महेश नागरी पतसंस्थेच्याचेअरमनपदी सीए सोमाणी:व्हा.चेअरमनपदी लड्डा यांची बिनविरोध निवड