Headlines

15 डिसेंबरनंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील: कोणत्याही विलीनीकरणाशिवाय ही घडामोड होणार, बच्चू कडूंचा मोठा दावा



डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने या विधेयकाला पाठिंबा दिल्याचे बोलले जात असून, पक्षातील नेत्यांनीही याबाबत संकेत दिले आहेत. अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू य

.

बच्चू कडू यांनी डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, पुनर्रचना होऊन एका जिल्ह्यात दोन खासदार होत असतील तर आवाज बुलंद होईल. अमरावतीत पूर्वी एक खासदार होता आता दोन होत असतील तर वाईट काय आहे? असा सवाल कडू यांनी उपस्थित केला. तसेच 15 डिसेंबरनंतर शरद पवार राज्याच्या सत्तेत दिसतील, तेही कोणत्याही विलीनीकरणाशिवाय, असे मोठे विधानही त्यांनी यावेळी बोलताना केले.

सोनिया गांधी घेणार शरद पवारांची भेट

संसदेत सोमवारी मांडण्यात येणारे मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयक पुन्हा एकदा हाणून पाडण्यासाठी इंडिया आघाडी पूर्ण ताकदीने सक्रिय झाली आहे. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे हे बडे नेते मैदानात उतरले आहेत. आज (रविवारी, ता. 29) सोनिया गांधी या द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे, इंडिया आघाडीच्या एका नेत्याने शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही फोन केल्याचे समजते.

विरोधकांच्या हालचालींवर फडणवीसांचा टोला

डिलिमिटेशन विधेयकावरून सुरू असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोजक्या पण बोलक्या शब्दांत विरोधकांवर प्रहार केला आहे. शरद पवारांच्या मनधरणीसाठी राहुल गांधींपासून सोनिया गांधींपर्यंत इंडिया आघाडीचे बडे नेते त्यांची भेट घेणार असल्याच्या चर्चांवर फडणवीसांनी भाष्य केले. यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी, “अब बहुत देर हो गई है”, असे म्हणत विरोधकांना टोला लगावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *