Headlines

रोहित पवारांच्या पत्रावर उद्या बैठकीत चर्चा करू: प्रत्येकाला भावना व्यक्त करण्याची मुभा, खासदार अमोल कोल्हेंचे वक्तव्य; सुप्रिया सुळेंना पाठवले पत्र



राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना पत्र लिहून डिलिमिटेशन विधेयकावरील आपली भूमिका स्पष्ट केली आहे. या पत्रावर आता खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देत, रोहित पवारांच्या पत्रावर पक्षात चर्चा

.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना अमोल कोल्हे म्हणाले, रोहित पवारांनी सुप्रिया सुळेंना लिहिलेले पत्र मी वाचले नाही आहे. यासंदर्भात आमच्या पक्षाने भूमिका स्पष्ट केली आहे. उद्या सकाळी आम्ही एकत्र बसू. बिलाचा ड्राफ्ट येईल. बिलावर आक्षेप का आहे, यावर चर्चा होणार आहे. ती उद्या सकाळी होईल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल. त्यामुळे रोहित पवारांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. प्रत्येकाला ही मुभा आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या भावना आम्ही विचारात घेऊ. रोहित पवारांचा रोख कुणाकडे आहे हे मला माहिती नाही, असे कोल्हे यांनी म्हटले आहे.

शरद पवारांवर टीका होताना वाईट वाटणे स्वाभाविक

पुढे बोलताना अमोल कोल्हे म्हणाले, सर्वांनी बिलाचा अभ्यास केलेला नसतो. ही वस्तुस्थिती असते. त्यामुळे एखादा नरेटीव्ह हा नरेटीव्ह असणे आणि त्याविषयी विचार करून त्या बिलात काय आहे, यावर चर्चा करणे गरजेचे असते. शरद पवारांवर टीका होताना वाईट वाटणे स्वाभाविक आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांचे योगदान फार मोठे आहे. हे डिलिमिटेशन बिल होऊदे नंतर जे टीका करणारे आहेत त्यांना आम्ही उत्तर देऊ, असा इशारा कोल्हे यांनी दिला आहे.

रोहित पवारांना हे पत्र पीए वगैरे कोणीतरी लिहून दिले असेल

तसेच रोहित पवार आमचे नेते आहेत. उद्याचे बैठकीत ते आहेत की नाही याची मला कल्पना नाही. लोकसभेत जेव्हा बिल येते तेव्हा ते केवळ ऐकीव माहितीच्या आधारे नाही तर बिलमधील गोष्टी कशा आहेत, याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. हा आक्षेप पाहता त्यात तथ्य आहे, असे वाटत नाही. रोहित पवारांना हे पत्र पीए वगैरे कोणीतरी लिहून दिले असेल. त्यात संविधान बदलाचा आक्षेप नोंदवला गेला आहे, तो बिलच्या ड्राफ्टमध्ये दिसत नाही. त्यामुळे रोहित पवारांच्या पत्राचा विचार होणार असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *