Headlines

अहिल्यानगरमध्ये बिबट्यासाठी शोध मोहीम सुरू: रस्त्यालगतच्या कंपाउंडमध्ये लपल्याची प्राथमिक माहिती


अहिल्यानगर शहरातील ‘सिक्युएव्ही’परिसरात वावरत असलेल्या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभाग आणि विशेष पथकाने सकाळी 8 वाजल्यापासून शोध मोहीम सुरू केली आहे. रस्त्यालगतच्या कंपाउंडमध्ये बिबट्या लपल्याची प्राथमिक माहिती आहे.

.

नवीन जिल्हाधिकारी रस्ता परिसरात बघ्यांची गर्दी जमली असून, ती कमी करण्यासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत. दरम्यान, वन विभाग आणि विशेष पथकाकडून बिबट्याला पकडण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

रविवारी सकाळपासून बिबट्याला पकडण्यासाठी जाळे लावण्यात आले आहे. आठ दिवसांपूर्वी या परिसरात पिंजरेही लावण्यात आले होते; मात्र बिबट्या अद्याप हाती लागलेला नाही. त्याला बेशुद्ध करण्यासाठी मारलेला ‘इंजेक्शन डार्ट’ही निष्फळ ठरल्याची माहिती समोर आली आहे.

बिबट्या याच परिसरात लपल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. येथे दाट लोकवस्ती असल्याने बिबट्या लोकवस्तीत शिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून वन विभागाने या परिसरात शोध मोहीम तीव्र केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *