Headlines

विरोधकांचा डिलिमिटेशनला नाही, तर महिला आरक्षणाला विरोध: 2023 मध्ये विधेयक मंजूर झाले तेव्हा विरोधक झोपले होते का?- देवेंद्र फडणवीस


विरोधकांचा डिलिमिटेशनला नाही, तर महिला आरक्षणाला विरोध आहे. यापूर्वी त्यांनी डिलिमिटेशनला मान्यता दिली आहे; पण आता लबाडी करत विरोध करत आहेत. यापूर्वीसुद्धा महिला आरक्षणाचा कायदा ही मंडळी लोकसभेत आणायची आणि संयुक्त समितीकडे पाठवून तो रखडवायची. मात्र,

.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, डिलिमिटेशनद्वारे (मतदारसंघाची पुनर्रचना) महिलांकरिता जागा आरक्षित होणार आहेत आणि 2029 मध्ये सर्व राज्यांच्या विधानसभा व लोकसभेत 33 टक्के जागा महिलांसाठी आरक्षित असतील. जे लोक डिलिमिटेशनला विरोध करत आहेत, त्यांचे वक्तव्य मी ऐकले; त्यावरून हेच लक्षात येते. कारण 2023 मध्ये ज्यावेळी महिला आरक्षणाचे विधेयक आले, त्यामध्ये डिलिमिटेशन करावे लागेल असे स्पष्टपणे म्हटले होते. हे सगळे माहिती असताना या लोकांनी त्याला मान्यता दिली. त्यावेळी काय आता विरोध करणारे झोपले होते का? त्यांना डिलिमिटेशन होणार हे माहिती नव्हते का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. “तेव्हा यांनी डिलिमिटेशनला पूर्ण पाठिंबा दिला होता, मग आता विरोध का करत आहात? तुमचा डिलिमिटेशनला नाही, तर महिला आरक्षणाला विरोध आहे, असेही ते म्हणाले.

विरोध करणारे लोक महिलाविरोधी

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, 2023 मध्ये महिला आरक्षणासाठी ‘नारीशक्ती वंदन’ विधेयक आले होते. त्याच वेळी डिलिमिटेशन करणे गरजेचे आहे आणि जागा वाढवाव्या लागतील, असे त्यामध्ये नमूद होते; पण त्यावेळी या लोकांनी विरोध केला नाही. कारण यांना वाटत होते की विधेयक संमत झाले तरी महिला आरक्षण लागू होणार नाही. पण आता मोदी महिला आरक्षण प्रत्यक्षात आणत आहेत हे लक्षात येताच, यांनी विरोध करण्यास सुरुवात केली आहे. हा विरोध डिलिमिटेशनला नाही, तर महिलांच्या 33 टक्के आरक्षणाला आहे. हे विरोध करणारे लोक महिलाविरोधी आहेत, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.

हे ही वृत्त वाचा

डिलिमिटेशनमुळे उत्तर-दक्षिण संघर्ष पेटणार:संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा डाव, दक्षिणेतील राज्यांवर मोठा अन्याय- राज ठाकरे

डिलिमिटेशन विधेयकामुळे देशाच्या हाताला काय लागणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा डाव आहे. यामुळे भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणमध्ये महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या सर्व राज्यांवर पुढील काळात अन्यायच होणार आणि तो दीर्घकाळ होणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा दक्षिणेचाच भाग आहे; मुघलसुद्धा महाराष्ट्राला दख्खन म्हणत, तर इंग्रज डेक्कन असे म्हणत होते. दक्षिणेतील राज्यांवर हा सर्वात मोठा अन्याय असणार आहे. हे सगळे केंद्रशासित करणे आणि सर्व काही केंद्रावर अवलंबून ठेवण्याचा हा डाव आहे. अजून काही गोष्टी आहेत, त्यासुद्धा हळूहळू तुम्हाला समजतील. वाचा सविस्तर



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Newsmatic - News WordPress Theme 2026. Powered By BlazeThemes.