Headlines

मुख्यमंत्र्यांची भाषा गावगुंडासारखी, महाराष्ट्राला शोभणारी नाही: ‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’ हे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला मान्य नाही- गोपाळ तिवारी – Gopal Tiwari Criticizes Devendra Fadnavis Over Controversial Statement



पुण्यात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परिसीमन विधेयकावरील वक्तव्यावर टीका केली. परिसीमन विधेयक कोणाचा बाप रोखू शकत नाही, असे म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांची भाषा गावगुंडासारखी असून, ती

.

गोपाळ तिवारी म्हणाले की, महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर, लोकमान्य टिळक, गोखले, आगरकर यांच्यासह अनेक समाजसुधारक आणि विचारवंतांचा वारसा आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, मनोहर जोशी आणि पृथ्वीराज चव्हाण यांनीही मुख्यमंत्रीपद भूषविले आहे.या राजकीय परंपरेत मुख्यमंत्र्यांनी कधीही न वापरलेली अरेरावीची भाषा फडणवीस वापरत आहेत; यातून त्यांची मानसिकता दिसते.

गोपाळ तिवारी म्हणाले की, केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून भाजपने राजकीय पक्षांमध्ये फूट पाडली. पक्षफोडी आणि राजकीय दडपशाहीतून मिळालेल्या संख्याबळाचा अहंकार मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यात दिसतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 48 पैकी 31 जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेने कौल दिला होता. भाजपविरोधातील हा कौल असताना, नंतर सत्ताधारी महायुतीत सहभागी झालेल्या खासदारांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री अहंकारी वक्तव्य करत आहेत.

गोपाळ तिवारी म्हणाले की, लोकसभेत परिसीमन विधेयकावर मतदान करताना खासदारांनी जनतेचा मूळ कौल आणि सदसद्विवेकबुद्धी लक्षात घ्यावी. त्यांनी संविधानिक मूल्यांच्या बाजूने भूमिका घेतल्यास फडणवीसांना धक्का बसेल. भाजपसमर्थक खासदारांचा परिसीमन विधेयकाला मिळणारा संभाव्य पाठिंबा जनतेच्या नैतिक कौलातून आलेला नाही, हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावे. लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवून सत्तेचा उन्माद दाखवू नये.

गोपाळ तिवारी म्हणाले की, विरोधी पक्षांतून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना सत्तेच्या जोरावर आपल्या बाजूने वळवून त्यांच्यावर वर्चस्व मिळवल्यामुळे मुख्यमंत्री अशी भाषा वापरत आहेत. प्रशासन आणि न्यायव्यवस्था हे लोकशाहीचे स्तंभ अद्याप पूर्णपणे सत्ताधाऱ्यांच्या नियंत्रणाखाली गेलेले नाहीत, याचे भान ठेवावे. ‘चोरी ते चोरी, पुन्हा शिरजोरी’ हे वर्तन स्वाभिमानी महाराष्ट्राला मान्य होणार नाही.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *