![]()
महिला आरक्षणाचे नाव पुढे करून देशाचे संविधान संपवण्याचा प्रयत्न भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सुरू असून, त्यांचा हा मनसुबा देशातील जनतेने ओळखला आहे, असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला आहे. तसेच, मतदारसंघ पुनर्रचनेबाबत (डिलिमिटेशन) क
.
नाना पटोले म्हणाले की, पंतप्रधानांनी वारंवार खोटे बोलणे आता चालणार नाही. महिला आरक्षण विधेयक 2023 मध्येच सर्वांच्या एकमताने पारित झाले आहे. वास्तविक पाहता, यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या विधेयकासाठी पुढाकार घेतला होता, मात्र त्यावेळी भाजपने याला विरोध केला होता.
महिला आरक्षणाचे विधेयक 2023 मध्येचे मंजूर
नाना पटोले म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे सरकार आल्यानंतर 2023 मध्ये हे विधेयक एकमताने मंजूर झाले. हे आरक्षण 2024 मध्येच लागू करता आले असते आणि आज अनेक महिला खासदार व आमदार सभागृहात दिसल्या असत्या. मात्र, भाजपच्या राजकारणामुळे हे आरक्षण अद्याप लागू करण्यात आलेले नाही. त्यामुळे भाजप नेमक्या कोणत्या नारी शक्तीबद्दल बोलत आहे, याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे, असेही नाना पटोले यांनी म्हटले आहे.
बाप-लेकीने घरात बसून निर्णय घेतला- वडेट्टीवार
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, शरद पवार गटाचा सत्तेसोबत जाण्याचा निर्णय आधीच ठरला होता. तो बाप-लेकीने मिळून घरातच घेतला आहे. पाठीत खंजीर खुपसण्याची शरद पवार यांची परंपरा कायम आहे.
पत्र दिल्यावर मंत्रिपदाची चर्चा होईल- प्रफुल्ल पटेल
प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ज्या दिवशी शरद पवार किंवा सुप्रिया सुळे एनडीएत सामील होण्याचे अधिकृत पत्र देतील, त्यानंतरच 2 मंत्रिपदांविषयी चर्चा होईल. पवारांना मी अनेकदा एनडीए प्रवेशाविषयी बोललो आहे.
पवार स्वत: पळून गेले हे बरोबर नाही- चंद्रकांत खैरे
उद्धवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे म्हणाले, अनेक लोक म्हणत होते की, पवार तुम्हाला धोका देऊन भाजपकडे जातील. आता तशीच परिस्थिती आहे. आम्हाला मविआत ठेवून पवार स्वत: पळून गेले हे बरोबर नाही.
सुशीलकुमार शिंदेंचा पाठिंबा तर प्रणिती शिंदेंचा विरोध
काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, विधेयकाला माझा पाठिंबा आहे. मात्र, प्रक्रिया सर्वसंमतीने व्हायला हवी. तर त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, हे विधेयक म्हणजे देश तोडण्याचा भाजपचा कट आहे.