Headlines

मेळघाटमधील ‘त्या’ जलविद्युत प्रकल्पाच्या मुद्द्यांची चौकशी करा: खासदार बळवंत वानखडे यांची वनाधिकाऱ्यांशी चर्चा



मेळघाटातील चिखलदरा तालुक्याच्या आडनदी-कामापूर येथे देशातील एका बड्या समूहाकडून प्रस्तावित उदंचन जलविद्युत (पंप स्टोरेज) प्रकल्प हा तेथील आदिवासींच्या जमीनी आणि समस्त मानवजातीच्यादृष्टीने आवश्यक असलेल्या पर्यावरणाच्या मुळावर घाव घालणार आहे. त्यामुळे त

.

दरम्यान एवढ्या मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र बाधित झाल्यास वन्यजीवांचे नैसर्गिक अधिवास, भ्रमणमार्ग, स्थानिक जलस्रोत, जैवविविधता, जमिनीची धूप आणि सूक्ष्म हवामानावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्यक्ष वृक्षगणना, वनक्षेत्राचे प्रमाणित नकाशे आणि पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास सादर करून वन विभागाने आपली भूमिका स्पष्ट करावी, असेही खासदार महोदयांनी सूचविले आहे.यावेळी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) जयोती बॅनर्जी, उपवनसंरक्षक के अर्जुना, इतर अधिकारी योगेश तपस, पाटील, भांड आदी उपस्थित होते. ^सदर प्रकल्पासाठीच्या सर्व प्रकारच्या संवैधानिक मंजुरी, सर्वेक्षणाच्या अटींचे कथित उल्लंघन, वृक्षतोड, वन्यजीवांचे अधिवास, आदिवासींचे वनहक्क, ग्रामसभांची संमती आणि स्थानिक जलस्रोतांवरील संभाव्य परिणाम यासंदर्भात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे आदिवासींच्या जल-जंगल-जमिनीच्या हक्कांशी मी तडजोड स्वीकारणार नाही. त्यासाठीच वन विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन वेगवेगळे मुद्दे जाणून घेतले. आता खासदारकीची आयुधे वापरुन शासन स्तरावरही संघर्ष करणार आहो. – बळवंतराव वानखडे, खासदार, अमरावती.

आदिवासींचे हक्कांबाबत तडजोड स्वीकार्य नाही



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *