![]()
तालुक्यातील कान्हेरी सरप परिसरातील रुहाटिया स्पिनिंग मिलला शनिवारी (दि. २८) दुपारी दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. आगीने काही क्षणांतच रौद्र रूप धारण केल्याने मिलमधील कापसाच्या रुईच्या गाठी, महागडी यंत्रसामग्री, तसेच इतर मौल्यवान सा
.
या दुर्घटनेत कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. मिलमध्ये आग लागल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांसह कान्हेरी येथील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी धावपळ सुरू केली. मात्र कापूस, रुईसारख्या ज्वलनशील साहित्यामुळे आगीने झपाट्याने परिसर व्यापला. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अकोला येथील अग्निशमन दलाच्या गाड्यांना पाचारण करण्यात आले. जवानांनी घटनास्थळी पोहोचून आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दरम्यान, आगीचे प्रचंड लोळ, धुराचे उंच लोट परिसरातून दूरवर दिसत होते. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. आगीच्या तीव्रतेमुळे मिलमधील मोठ्या प्रमाणातील साहित्य जळून खाक झाले.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी हे प्रमुख कारण कापूस, रुई व सुताचे धागे अतिज्वलनशील असल्याने आग सेकंदांत रौद्र रूप धारण करते. यंत्रसामग्रीतील घर्षण, शॉर्ट सर्किट किंवा ‘स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी’ ही या उद्योगातील आगीची प्रमुख तांत्रिक कारणे असतात.