![]()
परराज्यातून किंवा जिल्ह्याबाहेरून गांजा आणून त्याची चिल्लर विक्री करण्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा उघडकीस आले आहेत. मात्र, थेट शेतातच गांजाची लागवड करून त्याची विक्री करण्याचा नवा फंडा जिल्ह्यात सुरू असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या सलग तीन दिवसांच्या
.
शेतात खुल्या पद्धतीने गांजाची झाडे लावून ती मोठी होईपर्यंत स्थानिक पोलिसांना याचा सुगावा कसा लागला नाही, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. तब्बल शंभर किलोमीटर दूरवरून येऊन अमरावतीच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दुर्गम भागात कारवाई करते आणि लाखोंचा मुद्देमाल जप्त करते, यामुळे ठाण्यांच्या पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. ^आमच्या पथकाने तीन दिवसांत तीन ठिकाणी गांजाची लागवड उघडकीस आणली आहे. पकडलेल्या आरोपींची कसून चौकशी सुरू असून, ते कधीपासून ही शेती करत होते आणि हा गांजा नेमका कोणाला व कुठे विकला जात होता, याचा सखोल तपास केला जात आहे. यातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. – अशोक लांडे, पीआय, एलसीबी. एलसीबीने मागील तीन दिवसांत केलेल्या कारवाईंमधून गांजाची शेती सुरू असल्याचे समोर आले आहे. हा अत्यंत गंभीर प्रकार असून याचा सखोल तपास सुरू केला आहे. ज्या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत हे प्रकार आढळून आले आहेत, त्या संबंधित ठाणेदारांना कारणे दाखवा (शो-कॉज) नोटीस बजावण्यात येणार आहे. – निकेतन कदम, पोलिस अधीक्षक, अमरावती.
म्हणूनच मिरचीच्या शेतात गांजा लागवड! या तिन्ही कारवायांमध्ये पोलिसांना एक महत्त्वाचे साम्य आढळून आले आहे. आरोपींनी शेतात आंतरपीक म्हणून मुख्यतः मिरचीच्या झाडांमध्ये गांजाची लागवड केली होती. मिरचीच्या झाडांची पाने आणि गांजाच्या रोपांची पाने काहीशी टोकदार असून त्यांच्यात काहीशे साधर्म्य दिसते. सहजासहजी कोणाच्या लक्षात येऊ नये, यासाठीच आरोपींनी मिरचीच्या पिकाचा आधार घेऊन हा गोरखधंदा चालवला असावा.
तीन दिवसांत ७५ किलो गांजा शेतातून जप्त स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे, पीएसआय सागर हटवार व त्यांच्या पथकाने मागील तीन दिवसांत तीन मोठ्या कारवाया केल्या आहेत. त्यामध्ये गुरुवारी चिखलदरा हद्दीत २९ किलो गांजा झाडे, शुक्रवारी येवदा हद्दीत पावणे नऊ किलो गांजा झाडे व शनिवारी पुन्हा चिखलदरा हद्दीत सोमवारखेडा येथून ३७ किलो गांजा जप्त केला आहे. अशा प्रकारे तीन दिवसांत शेतात लागवड केलेली सुमारे ७५ किलो वजनाची गांजाची झाडे पोलिसांनी जप्त केली आहेत.