लखनऊ3 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

लखनऊमध्ये एका विक्षिप्ताने लग्नाला नकार दिल्यामुळे घरात घुसून २० वर्षीय बारावीच्या विद्यार्थिनीवर ॲसिडने हल्ला केला. तिच्या किंकाळ्या ऐकून तिला वाचवण्यासाठी आलेल्या आई-वडिलांवरही ॲसिड फेकले आणि चाकूने वार केले.
ही घटना रविवारी पहाटे ३ वाजता हुसैनगंजमधील उदयगंज परिसरात घडली. घरात आरडाओरड सुरू झाली. आरोपी पळू लागला, तेव्हा जखमी विद्यार्थिनीच्या आईने त्याला पकडले. त्याच्यावर चाकूने वार केले. ॲसिडने हल्ला करताना तोही गंभीररीत्या भाजला. त्यानंतर त्याने आपल्या उजव्या हाताच्या नस कापून घेतल्या.
आरोपी तौसिफ शाह उर्फ मन्नाचे लग्न झालेले नव्हते. तो ३५ वर्षांचा आहे. तो मुलीचा नात्यातील काका लागतो. तिचे दोन मोठे भाऊ असून त्यांचे लग्न झाले आहे. पीडित मुलीपेक्षा १५ वर्षांनी मोठा असूनही तो तिच्याशी लग्न करण्याचा हट्ट धरून बसला होता. मात्र तिचे कुटुंबीय याविरोधात होते.
तो पीडितेच्या घरापासून ५० मीटर अंतरावर राहतो. कुटुंबीयांनी सांगितले की, आरोपी छतावरून घरात शिरला. त्याने सर्वप्रथम मुलीवर ॲसिड फेकले. त्यानंतर कुटुंबीयांवर हल्ला केला.
घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी 5 जणांना केजीएमयूमध्ये दाखल केले. यामध्ये आरोपीव्यतिरिक्त पीडित, त्याचे वडील शाहनवाज (40), आई (40) आणि भाऊ यांचा समावेश आहे. शाहनवाज कारपेंटरचे काम करतात, तर आरोपी संगणक देखभालीचे काम करतो.