डिलिमिटेशन विधेयकाला अजूनही पाठिंबा वाढेल, अशी शक्यता आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी येत आहेत, म्हणजे ते मनधरणीचा प्रयत्न करतीलच; पण त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतलेल्या भूमिकेचा विचार केला, तर शरद पवारांची
.
संजय शिरसाट म्हणाले की, संजय राऊत हे सर्वात विद्वान व्यक्ती आहेत; त्यांना या विधेयकासंदर्भात आकस का आहे, हे त्यांनी सांगितले पाहिजे. आरोप करणे हे विरोधी पक्षाचे काम आहे आणि ते त्या पद्धतीने काम करतही आहेत. मग कधी एका खासदाराला दीडशे कोटी दिले असे म्हणतात, तर कधी गद्दार झाले म्हणतात; याला काही अर्थ नाही. शरद पवारांच्या तोंडातील वाक्य संजय राऊत बोलत आहेत की काय, असा संभ्रम काही दिवसांपूर्वी लोकांना झाला होता. आज त्याच पवारांना विरोध करण्याचे काम केल्याने लोक त्यांना गांभीर्याने घेणार नाहीत. एकनाथ शिंदे यांनी घेतलेली भूमिका कशी योग्य होती, हे आता त्यांना कळेल.

विरोधकांना दुसरे काम नाही
संजय शिरसाट म्हणाले की, आता ‘उबाठा’च्या हातात पश्चात्ताप करण्याशिवाय काहीही उरलेले नाही. राहुल गांधी यांनी वेगळी खेळी करण्याचा प्रयत्न केला आहे; पण शरद पवार हे मातब्बर नेते आहेत, त्यांना सर्व खेळींचा अर्थ माहिती आहे. विरोधकांना ‘फेक नॅरेटिव्ह’ पसरवण्याशिवाय दुसरे काही काम नाही. आता त्यांच्याकडे कोणी उरले नसल्याने लोकांकडे जात त्यांचे मनपरिवर्तन करण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला शिरसाट यांनी काँग्रेसला लगावला.
शरद पवारांच्या राजकारणाची विशिष्ट पद्धत
संजय शिरसाट म्हणाले की, शरद पवारांची राजकारण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. ते एकीकडे जायचे असले की दुसरीकडे चाललो असे सांगतात. पण शरद पवारांनी राजकारण करू नये, असे काही यांना लिहून दिलेले नाही. त्यामुळे शरद पवारांनी नवीन काही केले आहे, असे समजण्याचे कारण नाही.
हे ही वृत्त वाचा
डिलिमिटेशनमुळे उत्तर-दक्षिण संघर्ष पेटणार:संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा डाव, दक्षिणेतील राज्यांवर मोठा अन्याय- राज ठाकरे

डिलिमिटेशन विधेयकामुळे देशाच्या हाताला काय लागणार आहे? संपूर्ण देश केंद्रशासित करण्याचा हा डाव आहे. यामुळे भविष्यात उत्तर विरुद्ध दक्षिण संघर्ष पेटल्याशिवाय राहणार नाही. दक्षिणमध्ये महाराष्ट्र, गोवा, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि केरळ या सर्व राज्यांवर पुढील काळात अन्यायच होणार आणि तो दीर्घकाळ होणार, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र हा दक्षिणेचाच भाग आहे; मुघलसुद्धा महाराष्ट्राला दख्खन म्हणत, तर इंग्रज डेक्कन असे म्हणत होते. दक्षिणेतील राज्यांवर हा सर्वात मोठा अन्याय असणार आहे. हे सगळे केंद्रशासित करणे आणि सर्व काही केंद्रावर अवलंबून ठेवण्याचा हा डाव आहे. अजून काही गोष्टी आहेत, त्यासुद्धा हळूहळू तुम्हाला समजतील. वाचा सविस्तर