![]()
नागरिकांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी समन्वय साधणे ही लोकप्रतिनिधींची प्राथमिक जबाबदारी आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. पुणे लोकसभा मतदारसंघातील खासदार जनसंपर्क सेवा अभियानाचा विसा
.
गुरुवार पेठेतील पंचहौद टॉवरजवळच्या सेंट हिल्डाज हायस्कूलमध्ये हा जनता दरबार आयोजित केला होता. नागरिकांनी आपल्या समस्या आणि मागण्या मांडण्यासाठी येथे गर्दी केली.
वैयक्तिक प्रश्नांसह परिसरातील नागरी समस्या, सार्वजनिक सुविधांचे प्रश्न, रखडलेली कामे आणि शहराच्या विकासाबाबतच्या सूचना नागरिकांनी मोहोळ यांच्यासमोर मांडल्या. त्यांनी नागरिकांशी संवाद साधून प्रश्न जाणून घेतले आणि संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाही करण्यास सांगितले.
या वेळी महापौर मंजुषा नागपुरे, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंत रासने आणि पुणे महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. स्थानिक नगरसेवक, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकही सहभागी झाले.
पुणे लोकसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघांत दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी ‘मन की बात’चे प्रसारण आणि हे अभियान आयोजित केले जाते. नागरिकांना त्यांच्या परिसरात खासदारांशी थेट संवाद साधता यावा, प्रशासन आणि नागरिकांमधील समन्वय वाढावा आणि रखडलेल्या प्रश्नांचा पाठपुरावा व्हावा, हा अभियानाचा उद्देश आहे.
कसबा हा पुण्याच्या ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि व्यापारी जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. मध्यवर्ती भागातील दैनंदिन प्रश्न, नागरी सुविधा आणि विकासकामांबाबत नागरिकांनी मांडलेल्या सूचना व कल्पनांवरही जनता दरबारात चर्चा झाली.
जनतेच्या प्रश्नांसोबत विकासाच्या कल्पनांनाही प्राधान्य
खासदार जनसंपर्क सेवा अभियान केवळ नागरिकांच्या तक्रारी स्वीकारण्यापुरते मर्यादित नसून, शहराच्या विकासप्रक्रियेत नागरिकांचा सहभाग वाढविण्याचेही एक माध्यम आहे. आपल्या परिसराचा विकास कसा व्हावा, कोणत्या सुविधांना प्राधान्य मिळावे आणि नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिक सुलभ करण्यासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, यासंदर्भातील नागरिकांच्या सूचना जाणून घेण्यावरही या अभियानात भर दिला जात आहे.जनता दरबारात मांडण्यात आलेल्या प्रश्नांवर संबंधित प्रशासकीय विभागांमार्फत कार्यवाही व्हावी आणि प्रलंबित विषयांचा आवश्यक पाठपुरावा व्हावा, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.