Headlines

ठाकरेंच्या शिवसेनेचे शिल्लक राहिलेले खासदारही फुटणार: मंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा, संजय राऊतांच्या टीकेला जोरदार पलटवार – Uday Samant Claim: Thackeray Shiv Sena MPs To Split



डिलिमिटेशन विधेयकावरून सध्या देशभरात राजकीय हालचालींना वेग आला असून, सर्वच पक्षांनी आपल्या खासदारांना व्हीप बजावला आहे. शिवसेना ठाकरे गटानेही फुटीर सहा खासदारांना व्हीप जारी केला आहे. मात्र, हे खासदार आधीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने त

.

डिलिमिटेशन विधेयकाला पाठिंबा दिला नाही तर खासदार फुटतील अशी भीती सुप्रिया सुळे यांना आहे. म्हणून, त्यांनी डिलिमिटेशन विधेयकास पाठिंबा दिलाय, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावर प्रत्युत्तर देताना उदय सामंत म्हणाले की, असं बोलता बोलता यांचे पण खासदार फुटणार आहेत, शिल्लक असलेले. दोन दिवसांपूर्वीच खासदार अरविंद सावंत यांनी या विधेयकास पक्षाचा ना विरोध आहे, ना पाठिंबा अशी भूमिका मांडली होती. त्यामुळे आता ठाकरे गटातील उर्वरित तीन खासदारही विधेयकाच्या बाजूने मतदान करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार असून सामंत यांच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

उदय सामंत म्हणाले, महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये पूर्वीपासूनच समन्वय नव्हता हे अनेकवेळा आमच्यासारख्यांनी सांगितलं आहे. आता विधेयक दोन दिवसानंतर मांडले जाणार आहे, फ्लोअरवर नक्की काय होतंय याची उत्सुकता आम्हालाही आहे. शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आधीच पाठिंबा जाहीर केला आहे. आमचे खासदार विधेयकाच्या बाजूने राहतील आणि नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देतील.

फुटीर सहा खासदारांना ठाकरे गटाचा व्हीप

डिलिमिटेशन विधेयकाच्या मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाने मोठी राजकीय खेळी खेळली आहे. एकीकडे काँग्रेस नेते इतर पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाने बंडखोरी केलेल्या सहा खासदारांना आजच्या बैठकीसाठी व्हीप जारी केला आहे. जर हे खासदार या बैठकीला गैरहजर राहिले, तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते.

उद्धव ठाकरेंच्या ‘परिच्छेद 2(1)b’ बॉम्बचा प्रतिकार कसा करणार? – असीम सरोदे

या संपूर्ण प्रकरणावर अ‍ॅड. असीम सरोदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत भाष्य केले आहे. “मूळ शिवसेनेतून पळून गेलेले सहा खासदार आता उद्धव ठाकरे यांच्या ‘परिच्छेद 2(1)b’ च्या बॉम्बचा प्रतिकार कसा करणार?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. शिवसेनेतून मशाल चिन्हावर निवडून आलेले हे सहा खासदार आर्थिक फायद्यासाठी शिंदेसेनेत सामील झाले असून, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कोणतीही प्रक्रिया न पाळता त्यांना मान्यता देऊन वेगळी बसण्याची व्यवस्था करून दिली, अशी टीकाही सरोदे यांनी केली आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *